Selections from the Peshwa Daftar 2.37: [27-12-1753] A bridge of boats was being constructed to lead reinforcements to the Vazir across the Ganges.
Selections from the Peshwa Daftar 2.37
- Language
- Marathi
2.37
श्री.
पो बालाजी खंडेराव कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति. येथील कुशल ता॥ छ १ रौवल मुो कसबे पुट श्रीगंगाउत्तरतीर वर्तमान यथास्थित असे विशेष. आम्हास राजश्री दादांनी पूल बाधावयाची आज्ञा करून छ २६ सफरी रवाना केले ते छ २८ सफरी सोमवारी मु॥ मजकुरी पावलो. येथील पुल बाधावयाचे वृत तरी राजश्री भिवाजीपंत होलकऱ्यांकडिल आमच्या अगोदर दोन रोज आले होते. त्याणी गणमुक्तेश्वरच्या व येथील वगैरे जबलील येकूण नावा पंनास पर्यंत जमा केल्या आहेत. त्यांज बा॥ तोफखाना आला होता. तो उतरोन पार गेला. सुतार लोहार वगैरे कारखान्यामुळे काम चालीस लाविले आहे. दोनसे मजूरहि मेलविले आहे. मुजांची चराटे वलतात व छकडे लावून लाकडे आणविली. याप्राा सरंजाम होळकराकडील होत आहे. आम्हाकडील सरंजाम तरी सरकारची पत्रें काादारास होती. राउत देऊन मेरट व अनुपशहर व जाटाकडे वगैरे गंगातीराने पाठविले आहेत. आणखी तूर्त पंचवीस तीस नावा आलियावर येक पुल तयार करितों. पावणासे असी नाव लागतीलसा आजमास आहे. आम्हांकडील सरजाम काादाराकडील आल्यास सत्वरच तयार होईल. आपल्याकडील वृत सविस्तर लेहून पाठवावे. राजश्री शंकराजी नारायण अनुपशहराकडे पार उतरावयासी गेले होते. त्यास तेथील नावा तमाम बुडविल्या आहेत. त्यास तेथे कोण्ही उतरीना. याजकरितां मारनिले काली येथे आले. सिद्याकडील पागा अनुपशहराकडे गेल्या आहेत. तेथे नावा आजपर्यंत दाहाबारापर्यंत जमा जाहल्या आहेत, म्हणून सांगत होते.आपल्यास हे वृत श्रुत व्हावे, या करिता लिहिले आहे. बहुत काय लिहिणे. लोभ करावा हे विनंति.
सेवेसी सदाशिव रघुनाथ साष्टांग नमस्कार. लिखितार्थ परिसोन दया करीत जावी हे विनंति.