Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.38: [1754] This appears to be Jayappa Scindia's letter to Raghoba in the campaign against the Jaths.

Selections from the Peshwa Daftar 2.38

Language
Marathi

2.38

श्री.

सेवेसी विज्ञापना. चिठी पाठविली ते पावली. डिगेंतून फौज बाहेर निघुन गेली. याचा मार लिहिला. यैसियास फौज कोणीकडे गेली. यांचे तहकीक तों कळले नाहीं. परंतु त्यांची बातमी राखिली पाहिजे. यास्तव फौज कांहीं रवाना करावयाची तजवीज केली पाहिजे. काली रात्रौ फौज पाठवावयाची आज्ञा जाली होती. त्याजवरून येथून च्यार पांच हजार फौजेनसी चिरंजीव राजश्री दत्ताजी सिंदे यास पाठविलें. येथून डिगे पावेतो जाऊन आसपास पाहून आले. त्यांची फौज कोठें आढळली नाहीं. *सेवेसी श्रुत होये हे विज्ञाप्ति

[१ मुंज गवत.]