Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.39: [१७५४ जून.] The letter is addressed from Delhi to the Peshwa at Poona, may be, by Trimbakrao Pethe, who had accompanied Raghunathrao in that expedition, and contains the several alternatives which were under discussion with the Vazier (Gaji-ud-din).

Selections from the Peshwa Daftar 2.39

Language
Marathi

2.39

श्रीशंकर.

सो॥ कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना. आज्ञापत्र पावलें. दोन रोज खानखानासीं बोलतों. परंतु याची कोणेहि प्रकारें खातरजमा होत नाहीं. याकरितां तीन प्रकार योजिले आहेत. वजीरास बोलून ठराऊन यावें.

एक तर लाहोरची खिलत देऊन त्या बार तीन हजार फौज कुरुक्षेत्रा पावेतो द्यावी. आपुण गंगेकडे जाऊन पंधरा विस दिवसांत माघारे येऊन जयेनगराकडे जावें. तो फौज ही येईल या प्रो.

नवाब बोलले कीं आम्ही अंतःकरणापासून निर्मळ होऊन सरदारानीं म्हटले ते देऊन खानखानास समजाऊन आणीत असतां नच येत, तर आमचा तो अपराध नाही. सरदार थोर आहेत.

जसें त्यास उत्तम दिसेल तसे करतीलच. खानखानानी सरदारांबराबर जावें, हे आमच्या चित्तांत सहसा नाहीं. नच राहात व जातीलच व सरदारहि नेतीलच तर आमचा यत्नहि न्यावे.

हे गोष्ट नवाबास विचारिली. उत्तर दिधले कीं कुरुक्षेत्राकडे फौजहि पाठवणें आम्हास पुरवत नाहीं. व अतःपर आम्हीं फार चुलेंचुले जालों. नाकास जीव आला, महिनाभर गंगेस जाऊन माघारे येऊन मग जयनगरास जाऊ म्हणतात. हेहि या प्रांतीं कालहरण करून मुलुक बुडवावा व आम्हांस बाहेर पोट भरावयासहि निघूं न द्यावें हा विचार दिसतो. हेहि गोष्ट कशी आम्हासी पुरवेल ? ऐसेच आम्हास खराब करावयाचे चित्तांत असले तर साफ सांगा. जे आमचे कपाळीं असेल तें होईल.

दुसरा विचार खानसामा, समशामुदौला यानी एकांती खातरजमा करून घेऊन जावें, म्हणज यानेहि जावें. त्याजमध्थे कसर असली कामाचे नाहीं. विचार पाहतां हे खरेंच आहे. त्याची आंतस्ते खातरजमा नाहीं. तेव्हां जावें कसें ? हे तुहीं बळकट असेल तर करावे, नाही तर यांत वजिराची लबाडीं दिसते.

[१ अधीर, अस्वस्थ.]

स्नेह रक्षणे असले तर येथून उठून नीट दरकूच दक्षिणेस जयनगराकडे जा. गंगास्नान पुढें करा. आतांच करणे असेल तर बाहीरबुणगा जयनगराकडे लाऊन द्या, व तुम्हीं पांचा हजारा फौजेनसी सडे आठ दिवसा गंगास्नान संपादून दिलीस न येतां जाटाचे तालुक्यांत यमुना उतरून जयनगराकडे जा. मनोहरपुरास पावल्यावर रु. देवऊं. विश्वास नसला तर तुमच्या सावकाराची निशा देऊं कीं मनोहरपुरास पावल्यावर रुपये आपले सावकारापासून घ्यावे.

खान सामास तर बरे वाटत नाही. दरबारास येत नाहीं. समसामुद्दौला आले होते. त्यांची निशा पातशहानी वजीरानी अंतःकरणापासून केली. समसामुद्दौलानीं खातरजमा करून घेऊन खानखानास व स्वामीस व सुभेदारांस पत्रें लेहलीं, तें पहिले स्वामीपासी पाठविलीं आहेत. व विनंतिहि विस्तारें लेहली आहे. येथें तर शुधता व खातरजमा पुरती जाली.

तिसरी गोष्ट. सेवटीं काहींच नव्हे तर आम्हास खानखानास बरोबर घेऊन गेले पा॥. तेव्हां त्याचा तूर्त निर्वाह होईल.

खानखाना उगेच चितात वसवास उत्पन्न करून संशयच काढीत बसतील तर इच्छा त्यांची. वरकड इकडून तो बळकटी जाली.

येणें प्रमाणें जाबसाल जाला. पुढें जे उत्तम ते करावयास स्वामी समर्थ आहेत. वैreferrerरणीची तसदी म्हणून झीलेवर जायाची तजवीज चितांत आली तर आतां सध्या व काठीचा भला येथून तेथें तेथून येथें मजा नाहीं. लागलेच विल्हे लावून कूचाची तजवीज केली पो॥. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.