Selections from the Peshwa Daftar 2.40: [1753] Vithal Shivdeo's stern rebuke against plundering by Maratha forces is contained in this letter.
Selections from the Peshwa Daftar 2.40
- Language
- Marathi
2.40
श्री.
विनंति उपरी. पुढें फौज पाठविली ती लुटावयास पाठविली कीं काय. इतका आगरह करून उठविले. ते लुटीतात; ताकीद मानीत नाहींत. सराई आरबाची तेथवर चिरंजीव बापू गेले होते. आरब दाहा हजार आहेत. त्यातील सरदार येऊन भेटले. भेटावयास आणिले त्यास परस्परे वळून आपल्याकंडे नेतात.
जागाजागा सरदारी आहे. लांबहाते तो बोलून सांगतात कीं आम्हास रोजमरा नाहीं. आम्हासी लुटणे. हे गोष्टीचा बंदोबस्त करावा. नवाब गाजदीखान घाटावर निपट डेऱ्यासेजारीच आले, तेव्हा आम्ही हत्तीवर बसून जाऊन रामराम जाला. बोलिले की बापू सडे येका पालखीनसी पुढें नदीपार जाले. आम्हास संशय वाटला; याकरितां घाटावर आलो. घाटहि पाहिला, उतरलो हे बरें केलें. परंतु लूटफाट न करावी. लुटल्याने जे जो (?) लोक भेटणार ते त्यास अनुकूल होतील, आपल्यास भारी पडेल. याकरितां लुटीचे मना करावें. शहरांत लाखो माणूस आहे. त्यास मिळाले तर आपल्यास भारी पडेल. याकरिता ताकीद असावी हे उत्तम. पादशाहाचे बरे करणे; तेव्हा शहर तुमचा जे (जय) इच्छितो त्यास लुटावें म्हणजे ते दुःखी होतील. बेदुवा देतील. याकरितां रयतेचे रक्षण ते करावें. बाबूरायाबरोबर दाहावीस राहतात; नाहींतर दरोबस्ती लुगोरीला धावले आहेत. निमित्य आम्हावर घालतील. ये गोष्टीचा बंदोबस्त करावा. दुसरे, जेतागुजर यास आम्हाकडे घ्यावे. आज प्रहर येऊन मामलतीचा जाबसाल पुसोन पाठवून देऊं. गेला तर त्याचा जाबसाल करावयाकरितां जरूर रा॥ अंतोजीपंत नानास सांगून पाठवावा. त्यांचा तालुकाच; बनेल तर ठाणीच सोडून घेतली म्हणजे चिंता काय ? आपले दरबारी भेटावयास येईल त्यास धरावें येसे नाहीं. ये गोष्टी लोक वसवस खातील. असो, जे जाले ते जालेच. परंतु त्यास येथवर पाठवावे. आम्ही आपला जाबसाल करून पाठऊन देतो. बहुत काये लिहिणें हे विनंती.