Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.4.5

Selections from the Peshwa Daftar 2.4.5

Language
Marathi

2.4.5

विनंती सेवक बापुजी महादेव व दामोदर महादेव कृतानेक साष्टांग नमस्कार विनंती. येथील कुशल ता॥ छ १९ माहे रबिलावल मु॥ इंद्रप्रस्थ स्वामीचे कृपा- अवलोकनेकरून स्वस्तक्षेम असे विशेष. इकडील साकल्य वर्तमान अजुरदार जोड्यांबरोबर लिहून पाठविले आहे, त्याजवरून विदित जाले असेल. सांप्रत राजश्री माहाराव दुरजनसाल कोट्याहून स्वार होऊन उदेपुरास गेले. तेथुन राणाजी व एकत्र होऊन आपल्या फौजेच्या पुस्तगैरमीवर निघाले म्हणून वर्तमान आलें. त्याजवरून महाराज राजश्री ईश्वरसिंग यांनीहि सवाई जैपुराहून कूच केला. लोकांनीं बहुत मना केले. इतकी त्वरा करणें सला नाहीं. केवळ राणाजी येऊन निगृहावर पडले, ऐसे जाणावे, तेव्हां च कूच करावा, ऐसे उदंडानी म्हटलें. परंतु कोणाचेंहि नायकतां कूच करून दरकूच जाऊन आपलें फोजेत शामील जाले. चितांत आहे कीं, राणाजीचे फोजेस जंक दिधलीच आहे. हली जोपर्यंत राणाजी आपले फोजेत सामील जाले नाहींत तोंवर उरली फौज मारून घ्यावी, ऐसें चितांत आहे. कोटेवाला परतून येऊन कोट्यांत पावला. राणाजी मागती उदेपुरांत दाखल जाले म्हणतात. ईश्वरसिंगांच्या चितांत कीं राणा युध्यास नच ये तर त्याच्या मुलकांत स्वाऱ्या करून ते अजीज करावे. जैरीदाही होत जातो. पहावे ईश्वर ईच्छा काय आहे, व कैसा प्रसंग पडतो. यद्यपि राजश्री खंडेराव होळकर याजपासीं समुदाय थोडा आहे, तथापि तितक्यानसीच त्यांनीं यांस आडत्रांसास आणिलें. खाण्यापिण्याची परम मर्यादा जाली आहे. तृण धान्य बहुत महर्ग आहे. जैपुरकर तो केवल स्वपराक्रमेंच या कर्मास प्रवर्तले आहेत. व राणाजी तो केवळ स्वामीचे आश्रयावर या कर्मास प्रवर्तले, ऐसा आबालवृद्धीपर्यंत लौकीक जाला आहे. प्रांती जे आपण करतील तेच ईश्वर इच्छेनें होईल.