Selections from the Peshwa Daftar 2.4.6
Selections from the Peshwa Daftar 2.4.6
- Language
- Marathi
2.4.6
पुर्वी पातशहानी माहाबतजंगास लिहिले होते कीं, बंगाल्याचा दारमदार बाळाजीरायाचे विद्यमानें राज्यासी जाला. तुम्ही खातरजमा राखून खजाना पाठऊन देणें. येथून कराराप्रमाणें बाळाजीरायाचे रु॥ देवऊन ऐसा फर्मान गेला होता. त्याचें उत्तर आले कीं, हजरत या प्रमाणें लिहितात ; व बाळाजीराव याची पत्रें येतात कीं, जर रघोजी भोसले बंगाल्याकडे आलेच तरी सरदार फौजेसुधा तयार आहेत. तुमच्या कुमकेस येऊन पावतील व आम्हासहि रघोजीची पत्रें वरचेवर येतात कीं, मी येतो. तर हा बंदोबस्त कोणे प्रकारचा ? जर राज्यासीं चुकोता जाला तर रघोजी काय म्हणून येणार ? व बाळाजीराव ऐसे काय म्हणून लिहितात ? व हा संदेह अद्याप किमर्थ दूर होत नाहीं ? जोवर हा संदेह दूर जाला नाहीं तोवर माझ्यानेहि फौज दूर करवत नाहीं. व मुलुकही आबाद होत नाहीं. गंगेच्या कांठचा मुलुक तो वैराण. येथे एक कवडी उत्पन्न नाहीं. पल्याडील पाच रु॥ येतात ते फौजेस खर्चतात. खजाना कोठून येईल व कोठून पाठवावा? बरें यैसेहि असतां रघोजी अगर त्याची फौज या साली नच आली तर अखर सालपावेतों सिबंदी वजा जाऊन जो कांहीं ऐवज बाकी राहील तो हजूर रवाना करीन, ऐसे पत्र आले. यांत सारांश इतकाच कीं, जोपर्यंत रघोजीचा यावयाचा पुर्ता संदेह दूर जाला नाहीं, व मुलुक आबाद जाला नाहीं, तोंवर पुर्ता खजाना देवणार नाहीं. इतकें तात्पर्य दिसून आलें. त्यास येथून मागती ताकीद गेली आहे कीं, क्षपनिक्षेप रघोजी येतच नाहीं. तुम्ही फौज काशास ठिवतां ? दूर करा व मुलकासही उत्तम प्रकारे कौलबेल देऊन पुरती वसाहत करा. दुश्चित किमर्थ राहतां ? व खजाना झाडियानसी पाठवा. जर उणा अधीक येईल तर तितकाच उणा रु॥ बाळाजीरायास पावेल. त्याची तनखा तुम्हावर केली जाईल व सरकारचा जितका ऐवज राहील, त्याची सजांवली त्यासच सांगु. एवंच पुर्ता रु॥