Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.4: [20-3-1747] This letter giving details of the discussions in the Emperor's Court, shews how the Peshwa and his agents quietly worked themselves into the Emperor's favour and how he came to depend upon the Marathas in case of emergency. There is also a mention of a threatened invasion by Raghuji Bhosle into Beng

Selections from the Peshwa Daftar 2.4

Language
Marathi

[20-3-1747] This letter giving details of the discussions in the Emperor's Court, shews how the Peshwa and his agents quietly worked themselves into the Emperor's favour and how he came to depend upon the Marathas in case of emergency. There is also a mention of a threatened invasion by Raghuji Bhosle into Beng

2.4.1

श्री.

2.4.2

पौ छ २१ रबिलाखर

2.4.3

श्रीमंत राजश्री पंत प्रधान.

2.4.4

स्वामीचे शेवेसी

2.4.5

विनंती सेवक बापुजी महादेव व दामोदर महादेव कृतानेक साष्टांग नमस्कार विनंती. येथील कुशल ता॥ छ १९ माहे रबिलावल मु॥ इंद्रप्रस्थ स्वामीचे कृपा- अवलोकनेकरून स्वस्तक्षेम असे विशेष. इकडील साकल्य वर्तमान अजुरदार जोड्यांबरोबर लिहून पाठविले आहे, त्याजवरून विदित जाले असेल. सांप्रत राजश्री माहाराव दुरजनसाल कोट्याहून स्वार होऊन उदेपुरास गेले. तेथुन राणाजी व एकत्र होऊन आपल्या फौजेच्या पुस्तगैरमीवर निघाले म्हणून वर्तमान आलें. त्याजवरून महाराज राजश्री ईश्वरसिंग यांनीहि सवाई जैपुराहून कूच केला. लोकांनीं बहुत मना केले. इतकी त्वरा करणें सला नाहीं. केवळ राणाजी येऊन निगृहावर पडले, ऐसे जाणावे, तेव्हां च कूच करावा, ऐसे उदंडानी म्हटलें. परंतु कोणाचेंहि नायकतां कूच करून दरकूच जाऊन आपलें फोजेत शामील जाले. चितांत आहे कीं, राणाजीचे फोजेस जंक दिधलीच आहे. हली जोपर्यंत राणाजी आपले फोजेत सामील जाले नाहींत तोंवर उरली फौज मारून घ्यावी, ऐसें चितांत आहे. कोटेवाला परतून येऊन कोट्यांत पावला. राणाजी मागती उदेपुरांत दाखल जाले म्हणतात. ईश्वरसिंगांच्या चितांत कीं राणा युध्यास नच ये तर त्याच्या मुलकांत स्वाऱ्या करून ते अजीज करावे. जैरीदाही होत जातो. पहावे ईश्वर ईच्छा काय आहे, व कैसा प्रसंग पडतो. यद्यपि राजश्री खंडेराव होळकर याजपासीं समुदाय थोडा आहे, तथापि तितक्यानसीच त्यांनीं यांस आडत्रांसास आणिलें. खाण्यापिण्याची परम मर्यादा जाली आहे. तृण धान्य बहुत महर्ग आहे. जैपुरकर तो केवल स्वपराक्रमेंच या कर्मास प्रवर्तले आहेत. व राणाजी तो केवळ स्वामीचे आश्रयावर या कर्मास प्रवर्तले, ऐसा आबालवृद्धीपर्यंत लौकीक जाला आहे. प्रांती जे आपण करतील तेच ईश्वर इच्छेनें होईल.

2.4.6

पुर्वी पातशहानी माहाबतजंगास लिहिले होते कीं, बंगाल्याचा दारमदार बाळाजीरायाचे विद्यमानें राज्यासी जाला. तुम्ही खातरजमा राखून खजाना पाठऊन देणें. येथून कराराप्रमाणें बाळाजीरायाचे रु॥ देवऊन ऐसा फर्मान गेला होता. त्याचें उत्तर आले कीं, हजरत या प्रमाणें लिहितात ; व बाळाजीराव याची पत्रें येतात कीं, जर रघोजी भोसले बंगाल्याकडे आलेच तरी सरदार फौजेसुधा तयार आहेत. तुमच्या कुमकेस येऊन पावतील व आम्हासहि रघोजीची पत्रें वरचेवर येतात कीं, मी येतो. तर हा बंदोबस्त कोणे प्रकारचा ? जर राज्यासीं चुकोता जाला तर रघोजी काय म्हणून येणार ? व बाळाजीराव ऐसे काय म्हणून लिहितात ? व हा संदेह अद्याप किमर्थ दूर होत नाहीं ? जोवर हा संदेह दूर जाला नाहीं तोवर माझ्यानेहि फौज दूर करवत नाहीं. व मुलुकही आबाद होत नाहीं. गंगेच्या कांठचा मुलुक तो वैराण. येथे एक कवडी उत्पन्न नाहीं. पल्याडील पाच रु॥ येतात ते फौजेस खर्चतात. खजाना कोठून येईल व कोठून पाठवावा? बरें यैसेहि असतां रघोजी अगर त्याची फौज या साली नच आली तर अखर सालपावेतों सिबंदी वजा जाऊन जो कांहीं ऐवज बाकी राहील तो हजूर रवाना करीन, ऐसे पत्र आले. यांत सारांश इतकाच कीं, जोपर्यंत रघोजीचा यावयाचा पुर्ता संदेह दूर जाला नाहीं, व मुलुक आबाद जाला नाहीं, तोंवर पुर्ता खजाना देवणार नाहीं. इतकें तात्पर्य दिसून आलें. त्यास येथून मागती ताकीद गेली आहे कीं, क्षपनिक्षेप रघोजी येतच नाहीं. तुम्ही फौज काशास ठिवतां ? दूर करा व मुलकासही उत्तम प्रकारे कौलबेल देऊन पुरती वसाहत करा. दुश्चित किमर्थ राहतां ? व खजाना झाडियानसी पाठवा. जर उणा अधीक येईल तर तितकाच उणा रु॥ बाळाजीरायास पावेल. त्याची तनखा तुम्हावर केली जाईल व सरकारचा जितका ऐवज राहील, त्याची सजांवली त्यासच सांगु. एवंच पुर्ता रु॥

2.4.7

जलद् पाठऊन देणे, ऐसें धमकाऊन लिहीलें आहे. परंतु जोपर्यंत आपल्याकडून लिहिले गेले नाहीं, तोंवर त्याची खातरजमा कसी होते? जेटवड जवळ आली. जर या साली रघोजीचे अगर त्याचे फौजेचे निघणे होत नाहीं, हा निश्चय स्वामीस पुर्ता कळला असिला तर काय चिंता आहे ? सलाह असलिया ज्याप्रमाणें हजरून लिहिलें आहे त्याप्रमाणें आपणहि लिहावे. नादरशहाकडील वर्तमान आलें कीं बगदादचा पातशा अहमदशा आहे, त्याच्या विद्यमानें रुमवाल्यासीं व नादरशाहासी सलुखा जाला. रुमेकडून खातरजमा जाली. इरानचा तो बंदोबस्त आहेच. दुरानेमधे कोणी कोणी थोडी बहुत लबाडी केली होतीं. त्यांच्या पारपत्यास्तव हिरात म्हणून दुराणचे शहर काबुलेपासून सतरा मजली आहे, तेथें नवरोजाकारणें म्हणजे छ ९ रविलावलीं दाखल होणार होता. तेथुन सिकारपुराकडे म्हणजे अटकेपार दाऊद पोतऱ्याचा मुलूक आहे, त्याच्या व आणीख कोणी काबुलच्या जिल्ह्यांत पठाण आहेत, त्याच्या शासनास फौज पाठविणार. व गरज पडल्या हिरातेहून स्वताहि येऊन पावणार, ऐसे वर्तमान वरचेवर येऊन पावले. त्यास ऐसा जबरदस्त दोलक्षा

2.4.8

[१ तन देणें=पुढाकार घेणें.]

2.4.9

[१ साहाय्य, उपराला.]

2.4.10

[२ जक = पराभव.]

2.4.11

[३ खंडो.]

2.4.12

[४ अलिवर्दीखान.]

2.4.14

तरतूद करून ऐसा वजिरानी अर्ज केला. त्यानंतर पातशहानीं फेरोजेंगाकडे पाहिलें. हे बोलले कीं, आसफजहापासी चालिस हजार फौज तो मुकरर बारमाही असते. काम पडल्यावर आणीखहि विजापुरौ वगैरे दक्षणी तीस चालिस हजार स्वार जमा होऊ शकतात. एवंच सत्तर एसी हजाराची तो भरती तयारच जाणावी. याजवेगळे मऱ्हाठे तो कँमबेश लाख फौज आहे. हेहि असफजाहासी सलुख राखतात व त्यांच्या म्हटल्यात आहेत. समयास रॅफीक होतील. आज्ञा जालिया त्यासहि लिहून पाठऊं. पातशहा बोलले कीं बरें; वर्तमान तो लिहा; व त्याची काय मसलहत ते लिहून आणवा. बहुधा फेरोजंगानें बापास लिहिले असेल. मग पातशहांनीं सफदरजंगाकडे पाहिलें. हे बोलले कीं, मजपासी जो खजाना व माल आहे तो हजरतच्या निसौर आहे. येथें व सुब्यांत व ठाण्यांत मिळोन चाळीस हजार स्वार मजपासीं मोजूद आहेत. समयास जो पैका आहे तोहि वेचून ज्यासमईं हजरत * * उभे राहतील ते समईं आपल्या जानमालासी तसँदुक होईन. फत्ते देणे ईश्वराचे स्वाधीन आहे. त्याजमंधें जर मऱ्हाठे माझे पुरते रफीक आणभाणपूर्वक होत असिले तर हजरतनी तसदी न करावी. मग मजला आणिख कोव्हाची गरज नाहीं. रजपूत वगैरे कोण्हीहि पाहिजेत नाहीं. एक फौज त्यांची व एक फौज माझी इतक्यानसीच जो प्रसंग पडेल तो समजून घेऊं. ऐसिया जी ही गोष्ट सांगितली, पातशहानी सर्वांचीं अनुमतें मात्र घेतलीं, कोण्हास कांही उत्तर दिधले नाही. परंतु नित्यानी च्यार च्यार सा सा घटका एकांत हाच मजकूर असतो. पातशहास कोव्हाचाहि भरोसा वाटत नाहीं. कांहीं अंधपुत्राचा मानितात; परंतु समयास सलुक करायास लागतो त्याजपेक्षा काहीक अधिक आपल्याकडीलहि घावादावाची लढाई नादरशहाच्या तुल्य मानितात. अद्याप या गोष्टीचा सरवा (सराव ?) आम्हासी कोणीही कांहीं सरवा (सराव?) केला नाही. परंतु वजीर सफदरजंग, गाजुदीखां, राजे अफजुखां वगैरे जेव्हा याचे घरास जावें तेव्हां हे बोलतात कीं, जर नादरशहा दक्षगेस परभारें गेला तर तुमचे लोक काय करतील. जर इकडे आला तर तुम्ही काय तरतूद करून दाखवाल. आम्ही पृथक पृथक त्यासी हेच बोलतो की, जर तो परस्परे दक्षगेस येतो तर या गोष्टीची चिंता ईश्वर इच्छेने येथें कांहींच नाहीं. येका(ल)कीं काय प्रसंग होतो. यावत्शक्ति त्यास कोण्ही जिवें सोडावें असे तर नाहीं. मग नकळे. आयुष्य असलिया निघोन गेला तर नकले. जर हिंदुस्थानांत आला तर इकडील तरतूद तुमच्या विचाराचे स्वाधीन आहे. ज्या प्रा॥ तुम्ही सांगाल त्या प्रा॥ करतीलच करतील. सफदरजंग व वजीर बोलले कीं, तुम्ही आपल्या तरफेने बाळाजीरायांस लिहून त्यांची काय सला व ते याप्रसंगी कसकसी तरतूद करतील तेहि आणवा, ऐसे या उभयतांनीं सांगितलें. ऐसियास नादरशाह लक्ष वाटे तो न ये. कदाचित आला तर स्वामीचा काय विचार ? कांहीं तरतूद आपल्याकडून

2.4.15

[१ तगादा.]

2.4.16

[२ गाजी उद्दीन निजामुल्मुल्कचा वडील मुलगा.]

2.4.17

[१ मुकरर.]

2.4.18

[२ मदतनीस.]

2.4.19

[३ स्वाधीन.]

2.4.20

[४ हजीर.]

2.4.21

Ca 51-2 बनून येईल किवा नाहीं. जर आली तर कोणत्या प्रकारें, कोणत्या स्थळीं, किती फौजेनसीं, कोणत्या करारावर, कसकसें चितांत असेल ते लिहून पाठविलें पाहिजे. कीं रोकडे पातशहास अर्ज करावयास जागा होईल; कीं तेहि याप्रमाणें बंदेगीस हजर आहेत व याप्रमाणें तरतूद करूं इच्छितात. पातशहाचे मनांत विश्वासहि आहे कीं, जे मऱ्हाठे बोलतील ते करतील. तर आपला मनोदय काय तो लिहिला पाहिजे. सेवेसी श्रुत होय. बहुत काय लिहिणे. कृपा केली पाहिजे, हे विनंती.

Discussed in (1)