Selections from the Peshwa Daftar 2.4.7
Selections from the Peshwa Daftar 2.4.7
- Language
- Marathi
2.4.7
जलद् पाठऊन देणे, ऐसें धमकाऊन लिहीलें आहे. परंतु जोपर्यंत आपल्याकडून लिहिले गेले नाहीं, तोंवर त्याची खातरजमा कसी होते? जेटवड जवळ आली. जर या साली रघोजीचे अगर त्याचे फौजेचे निघणे होत नाहीं, हा निश्चय स्वामीस पुर्ता कळला असिला तर काय चिंता आहे ? सलाह असलिया ज्याप्रमाणें हजरून लिहिलें आहे त्याप्रमाणें आपणहि लिहावे. नादरशहाकडील वर्तमान आलें कीं बगदादचा पातशा अहमदशा आहे, त्याच्या विद्यमानें रुमवाल्यासीं व नादरशाहासी सलुखा जाला. रुमेकडून खातरजमा जाली. इरानचा तो बंदोबस्त आहेच. दुरानेमधे कोणी कोणी थोडी बहुत लबाडी केली होतीं. त्यांच्या पारपत्यास्तव हिरात म्हणून दुराणचे शहर काबुलेपासून सतरा मजली आहे, तेथें नवरोजाकारणें म्हणजे छ ९ रविलावलीं दाखल होणार होता. तेथुन सिकारपुराकडे म्हणजे अटकेपार दाऊद पोतऱ्याचा मुलूक आहे, त्याच्या व आणीख कोणी काबुलच्या जिल्ह्यांत पठाण आहेत, त्याच्या शासनास फौज पाठविणार. व गरज पडल्या हिरातेहून स्वताहि येऊन पावणार, ऐसे वर्तमान वरचेवर येऊन पावले. त्यास ऐसा जबरदस्त दोलक्षा