Selections from the Peshwa Daftar 2.41: These two letters (40, 41) of happenings at Delhi deserve being more clearly
Selections from the Peshwa Daftar 2.41
- Language
- Marathi
2.41
श्री.
विनंति उपरी. तेथून निघोन सडे स्वारीनशी सालिमार बागावर मुकाम केला. आलीकडील वर्तमान फौजेचे ठीक नाही, त्यास येथे रिकामे बसून काये करावे? राजश्री सुभेदाराकडे आबदुल हयांतखानाचे आनुसंधान आहे ते तरी बळावावे. तुम्ही जाब देविला नाही म्हणून सुभेदार म्हणत होते याचे कारण काये? आथ:पर सुभेदारास लिहून त्यास लस्करांत आणवावे. बनले तर उतम, नाहींतर त्यास पावते करवावे. मोगलपुज्याचे मोगल कार्य करून देऊ म्हणतात. परंतु गाजदीखानाच्या हाते करवावे हे त्यांचे मानस. दरवाजा त्यानी मोकला CC-0. Agamnigam Digital Preservation Foundation, Chandigarh
[१ लुटीला.]
[२ अंताजी माणकेश्वर.]
करून देऊं म्हणतात. परंतु तुम्ही मऱ्हाठे, आमचाच पुरा लुटू लागाल, मग
बखेडा होऊन मोगल दहा हजार तरवार धरतील तर काम बिघडेल. त्यास
गाजदीखानाचा सामान पुढे करावे; दरवाजा ते घेतील. आपण मागून चालावे.
हा परियाये उत्तमांत आहे. त्यास गाजदीखान (याजकडे?) नागरमल यास
पाठवावे. आमचे सुभेदाराचे बुनगे पाठवावे. मोगलपुरयाचे पाठीमागे मुकाम
करून अबदुल हयातखान यासहि सुभेदार आणवितील. मोगलांचेहि ठीक
करून, पुढे मोगल गाजदीखानसुधा, आम्ही मागून, यैसे हेहि बनले तर करावे.
त्यास आतांच गाजदीखानाचा हरकारा सोनपत करनालेहून आला. त्याने
वर्तमान सांगितले की संमदखान सात आठ हजार फौजेनसी सरदेहून कूच करून
राज्याची सराई आठ कोस आलीकडे आला होता, परंतु माघारा गेला. तीन
हजार त्याची फौज च्यार पांच सिबंदी यैसे सांगितले. फिरोन त्यास सुभेदारांनी
च्यार रुपये देऊन माघारा पाठविला, येणे प्राा वर्तमान आहे. बहुत काये लिहिणे
हे विनंती.
explained. They seem to refer to the entry of the Marathas into Delhi under
Raghunathrao in June 1754, before Gazi-ud-din Khan deposed Emperor
Ahmadshah. The letter appears to be in the hand-writing of Vithal Shivdev
and addressed to Sakharam Bapu. The words चिरंजीव बापू seem to refer
to the writer's son, Shivaji Pant.
Discussed in (1)
- Fall of the Mughal Empire — Sarkar 1932, English