Selections from the Peshwa Daftar 2.43: [1-9-1754] Samsher Bahadur asks clear orders from Sakharam Bapu as to whether he should go back from the Delhi campaign of 1754.
Selections from the Peshwa Daftar 2.43
- Language
- Marathi
2.43
श्री.
पो॥ छ १८ जिल्काद
श्रीमंत सखारामपंत बापू
गोसावी यांसी.
छ सकल गुणालंकरण अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य श्रो समशेरबहादर
सलाम विनंती उपरी. येथील कुशल ता॥ छ १३ जिल्काद मुकाम रेवडी जाणोन
स्वकुशल लिहीत असिले पाहिजे विशेष. आम्ही देशास जावयाविशी श्रीमंत
राजश्री दादासाहेबापासी आज्ञा मागितली, परंतु खावंद आज्ञेचा अनुमान चित्तांत
आणून, न जावें या आशयें येक दोन वेल उतर जालें. आपणहि श्रीमंतासनिध
नव्हते, स्वारीस आपणहि गेले आहेत. श्रीमंताचा आशय जे, राजश्री रामचंद्रपंत
व राजश्री विसाजीपंत व राजश्री मानाजी पायेगुडे व रा॥ महिपतराव (पानसे)
तोफखानासहवर्तमान समागमे देऊन रेवाडीस रवाना केले. खासा स्वारी आठा
दिवसा मागून येईल. आपणाकडील साकल्य वृत, आपले मुकाम कोणे जागा
आहे हे लिहिले पाहिजे. बहुत काये लिहिणे लोभ असो दीजे हे विनंती.
वरकड कितेक वर्तमान राजश्री रामचंद्रपंती लिहिले आहे त्याजवरून कळेल
हे विनंती.