Selections from the Peshwa Daftar 2.44: [January 1755] Second sheet of a letter addressed to the Peshwa referring to the capture of Gohad.
Selections from the Peshwa Daftar 2.44
- Language
- Marathi
2.44
श्री.
दुसरा बंद—
पुरवणी श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसी विज्ञापना.
कडें गेले. गोहदकराचा मुलूक, श्रीमंत राजश्री मल्हारजी होळकर याणी ठाणी
घेतली होती ती व श्रीमंतानी ठाणी सोडविली तीं तसीच सरकारांत राहिली.
खातरखा मामलत जाली नाहीं. आंम्हाकडील जिगणीचे ठाणे गोहदकराकडे होते
ते श्रीमंत राजश्री साहेब ज्वहारसिंगाचे मोहऱ्यावर आले तेव्हां राजश्री विठल सिव-
देव यास पाठऊन ठाणे घेतले. आमचे कारकुनाचे स्वाधीन केले. पिपरसेव
म्हणून गोहदकराचे ठाणे कुवारी नदीचे कांठी होते. छोल्याचे सराईचे आलीकडे
दोन कोस त्याने गोळी वाजविली. ते श्रीमंतानी कापून काढिले. तेहि आमचे
Ca 51-9 कारकून नारो बचाजी तेथे आहेत त्यांचे स्वाधीन केले. आम्हास राजश्री गोविंद सामराज याचीं पत्रें आलीं याजकरितां माघ वद्यांत जाऊं. तिकडे जाऊन जसा सुमार पाहूं त्याप्रमाणे राहणें जालें तर राहूं. राजश्री विठ्ठल सिवदेव यास ग्वालेर प्रांती श्रीमंत ठेवणार व राजश्री नारो शंकर यास झांसी प्रांती ठेऊन खासा स्वारी जेनगरावरून देशीं येणार यैसेहि म्हणतात. गोहदकरानी सिंद्याचे हाते सलुख केला. फौज उठोन गेल्यावर पैसा टका कांहीं ठरला होता तो दिल्हा नाहीं. येकून दंब (बंद ?) राहिले. पुढे काय होईल ? खर्च आमचा भारी. देशीं आपला लाभकाल कोठे नाहीं ऐसे जाणोन जातो. चिरंजीव निळोपंत भाद्रपद मासीं भेटीस येतील. त्याचा सांभाल करावा. चैत्र मासचा हप्ता व जेष्ठ मासचा हप्ता यैसे येथें कोन्हाची वरात केली तर त्यास देतील अथवा तेथेंच करारास येवज प्रविष्ट करतील. येथें देविला तर हुंडणावळीची रयात होईल.