Selections from the Peshwa Daftar 2.45: [1755] Vithal Shivdeo's letter, second sheet, to the Peshwa about the conquest of Gohad. He refers to the mismanagement of affairs by Raghoba.
Selections from the Peshwa Daftar 2.45
- Language
- Marathi
2.45
श्री.
पुरवणी श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामीचे सेवेसी विनंति. कुल पलोन बेहडात गेली. नाहीं तर कुल लुटून घेतली असती. नवी सिबंदी लाख रुपये खर्च जाला. त्याचे सार्थक स्वामीचे पुण्यप्रतापे उतम जाले. जाटाची शक्ति सुटली असे. त्यास आपली फौज असती तर कितीक कामे होती. यास सुरजमनाचा असरा आहे. आम्ही दिलीस श्रीमंतास दाहा बारा पत्रे पाठविली, परंतु आमची फौज आली नाहीं. रागी करितो यैसेच लिहितात. त्यास राणा भीमसिंग याचा मुलूक साता अठा लाखाचा आहे. आमचे लाख रु॥ तो खर्च होऊन गेला. आम्ही मुलूक घेतो ; राजश्री अंताजीपंताचा पैका राणा देतो ; त्याप्रा॥ मुलूक अम्ही घेतलियावर त्यास देऊं. या प्रांतात फार बदनक्ष जाला होता, परंतु नवीन सिबंदी ठेऊन नक्ष स्वामीचे पुन्येकडून उतम जाला. त्यास इकडे जातमय जाले असे. त्याचे येक वेल पारपत्ये केलियावाचून हिंदुस्थानात नक्ष नाहीं. राणा भीमसिंग याचा मुलूक घेतला म्हणजे गालेरचा किला अनयासेच येईल, किंवा पूर्ववत किलेदारप्रा॥ राहील. अण मुलूक साता अठा लाखाचा सुरलीत होईल. सुमेरशानें दुंडी उठविली, त्याप्रा॥ दुंडी उठविली. तमाम जमीदार फिरले, ठाणी घेतली. त्यास फतेसिंग मारलियावर* दुंडी वारली. नक्ष स्वामीच्या पुणेकडून जाला.
[* येथून अक्षर वेगळें.]
आम्ही दिलीस येसेच हे टाकून जात होतो. परंतु श्रीमंत दादासाहेबांची पत्रावर पत्रे आली कीं तुम्ही तो शेह सोडून न येणे. मागून फौजा पाठऊन जाटाचे पारपत्य करणे आहे, तुम्ही न येणं, त्यावरून राहिलो होतो. राहिल्या हे कामहि जाले. पुढें मुल्लकहि सत्वरच सुटल्यास हे येक सरकार कामच जाले. सेवेसी श्रुत होये हे विज्ञाप्ति. जाटाचे लढाईत तागाईत कुंभीर से सवासे घोडे पडले आहे. समजावीस नालबंदीचा विचार हा कालपर्यंत कांहीं होत नाहीं. दिलीच्या पैक्यावर मात्र इमारत आहे लोकास रोजमऱ्याविसी वगैरे रवानगी नाहीं, आर्जबाब नाहीं. यामुळे सर्व फौज दिलीची हुजरातसुधा हैराण आहे. सेवेसी श्रुत होये हे विज्ञाप्ति.