Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.46: [29-5-1755] Autograph draft of Raghoba writing to Gaziuddin asking him to join and help the Maratha forces, although he himself was returning to the Deccan.

Selections from the Peshwa Daftar 2.46

Language
Marathi

2.46

श्रीसांब.

मसुदा गाजुद्दिखान.

* उपरि. तुम्ही पत्र पाठविलें त्यांत खुलासा कीं आपण माघारे जावयाची त्वरा न करावी. आम्ही जलद येऊन पोहोंचतों. शाहाचा पेंच पडला तरी रोहिले पठाण आपणांस सामील आहेत, या आशयानें लिहिलें, तें पावलें. ऐसियासी आम्ही शाहाची दहशत मनांत आणून जातों ऐसें नाहीं. आम्हांस बहुत कामें आहेत. यास्तव दुसरे जागा च्यार रुपये मेळवावे ऐसे विचारें कूच केलें आहे. तुम्ही महिना पंधरा दिवसाचा वाइदा करून गेलां. त्या गोष्टीस कर्मंबेश नव दाहा महिने जाहाले. तुमचा भरोसा बहुत होता कीं, जलद रोहिले पठाणास घेऊन याल. आणि येक विचारें तमाम पातशाहीचा बंदोबस्त करूं. परंतु ती गोष्टी ईश्वरसत्तेनें न घटली. बरें, यासी तुमचा उपाय काये ? अतःपर यमुना दक्षणतीरास आला असिला तरी बमैफौज जलद जलद येणे. खेचीच्या आसपास मुकाम आहेत. भेटी जाहल्यावरी तुमचे आमचे सल्ह्रेनें ठरेल तो मनसुबा केला जाईल. जर यमुना उत्तरतीरे असिला तरी नच येणें. उत्तर मात्र जलद पाठवणें. सारांश रोहिले पठाण यांचा स्नेह जाहला तो बराच आहे. कदांचित् आम्ही दक्षणेस अथवा गुजरात हर कोठें लांब गेलो तरी सरकारचे सरदार, कमाविसदार राहातील, त्याची कुमक करावी. तेहि तुमची करितील. जर याच प्रांतीं राहावयाचें मुकरर जाहालें तरी जो मनसुबा ठरेल त्या कामास फौज बोलाऊन घेऊं. अपणास कळावें म्हणोन लिहिले असे. उत्तर जलद पाठवणें. त्यासारिखी येथील मनसुब्याची योजना होईल. छ १७ साबान.

[* सर्व पत्र राघोबाच्या हांतचे आहे.]

[१ जवळजवळ.]