Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.47: [18-7-1755] Ganesh Sambhaji (Khandeker) complains from the North to the Peshwa against the departure of Raghunathrao with his forces into the South.

Selections from the Peshwa Daftar 2.47

Language
Marathi

2.47

श्री.

पो। छ २१ जिलकाद

श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामीचे सेवेसी.

विनंती. सेवक गणेश संभाजी कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना. ताा छ ८ सवाल मु॥ कुलपाहाड येथे सेवकाचे वर्तमान यथास्थित असे विशेष. स्वामीचे आज्ञापत्र छ १० रमजानच आले ते छ ६ सवाली सेवकास पावले. तेथे आज्ञा कीं फौजसुधां राजश्री मल्हारजी होळकर याजकडे जाणे. त्यावरून आम्ही तयारी केली. तो त्यांची पत्रे आली कीं तुम्ही अंतरवेदींत उतरणे आणि तिकडील बंदोबस्त करणे. याजकरितां आम्ही येमुनातीरास जाऊन राजश्री गोपाळराव यास कुन्यास बसविले आणि तमाम ठाणियाचा बंदोबस्त केला. तैसेच राजश्री बाळाजी गोविंद याजकडील बंदोबस्त केला. पुढें जावें तो राजश्री मल्हारजी होळकर फौजसुधां निघोन स्वामीकडे गेले. तैसेच राजश्री बाबुजी नाईक व राजश्री गोपाळराव हे गेले. इकडे कोण्ही मातबर फौज राहिली नाहीं. त्यास स्वामीस फौजा काढून नेणे होते तरी इकडे ब्राम्हणाचे कबीले होते, पुढें घालून न्यावयाचा बंदोबस्त करून न्यावे होते, न केले. ब्राम्हण कबिलेसुधां होते. त्यास उदक सोडले. ऐसे जाले. त्यास इकडील बंदोबस्त हा कालवर सेवकांनी उत्तम प्रकार राखला आहे. तरी इकडील उपराळा करणे असल तरी सत्वर मदत स्वामिनी केली पाहिजे. नाहीतरी तैसीच सेवकास आज्ञा करावयाची असल ती करावी. वर्तणूक आज्ञापत्र येईल त्या प्रमाणे होईल. फौजा जातांच गव्हाराही गडबड मांडिली आहे. कोटकिले आपले ब्राम्हण टाकून पळो लागतील. गड या प्रांतींचे गेलियानंतर मग आशा कशास ठेवावी? ऐसा समय प्राप्त जाला आहे. यासाठीं सूचनार्थ विनंती लिहिली आहे. आज्ञा येईल त्या प्रमाणें वर्तणूक करीन. झासी प्रांताचा बंदोबस्त करणे म्हणोन हातारोखा- आला व रा। बाबुराव लागू जाले आहेत. त्यावरून तेथील उपरालियास जातो. श्रुत होय. हव्यास जटाशंकर यास हिंदुप्ताने मोर्चे लाविले होते. त्यास त्रिसाजीपंत सागरवाले याणी भोसले आणून मोर्चा मारून काढिले. आणि भोसले गेले असून वैर जाले आहे. त्यास या प्रांताची आशा नसली तर तैसेच ल्याहावयासी आज्ञा जाली पाहिजे, म्हण्जे उठोन येऊं. श्रुत होय हे विज्ञापना.

[१ गन्हार = वाईट, मवासी लोक.]