Selections from the Peshwa Daftar 2.48: [16-8-1755] News-letter giving details about the murder of Jayappa Scinde.
Selections from the Peshwa Daftar 2.48
- Language
- Marathi
2.48
श्री.
विनंती उपरी राजकी वर्तमाण तर वजीरासी व जाटासी कळासी बसत नाहीं. जाट ८ लकार देतो. परंतु वजारतचे व सारभोमाचे बळ नाहीं. भुपती किलीयांत दाखल जालेत. अवघे सूत्र वजीरावर ?
माधोसिंगाकडे ऐवज सरकारचा निमित्य श्रीमंत दादाणी जोडी पाठविली. परंतु ते सांप्रत्य ऐवज देत नाहीं. रांगडे एकसूत्रमणी १ [रांगडे एका माळेंतले मणी.]
नागोरचे वर्तमाण जयापावर रजपुताणी दगा केला. विस्वास दाखवून घर घेतले. रागडलोक णिरदय, दगाबाज. सरकारची पत्रेहि जयसिंगापासी गेली की ते जयापास देणे. मतलब कीं कराराप्रमाणे ऐवज देतील. तुम्ही अजमेरीपावेतो जाऊन उतरा. जर ऐवज न देतील तर पाहून घेणे. हे पत्र वकील घेऊन जयापापासी जाताना बोलला की ते पत्रे माणीत नाहींत. कासीयासी पाठविली जर म्हणाल तर जाऊन दगा करून मारीन. की मृत्यु पावल्यामागें लक्षाचा पटा कुटुंबास चालवणें. ऐसा करार करून एका घोडीयावर बसून येऊन, चौघे आणिक साधक घेऊन येऊन, जयापासी येऊन उत्तरनिरोत्तर करून संद गांठून दगा केला. चौघे तेहि मृत्यु पावले. मग लस्करात शंखनाद जाला. अवघे सिध जालेत. विचार द्रुढ केला. द्वाही जयापाचे पुत्राची फिरली. मोर्चे कायम केले. नागोरची फौज नागारेस व जालोरची जालोरेस व जोतपूरची जोतपुरास कायमे. अजमेरीस विचार यावयाचा जाहला होता तो राहिला कीं आता फुटून फळी उचलावी तर बाजी जाते. हिंदुस्थानास तमाम इस्तकॅलाली येईल. अवघे फितूर करतील. आतां खेळ मोडावा, शह न सोडावा. आतां दंड लागले. रांगड कापून काढावे ऐसा करार जाला. फौजा कायम जालिया ऐसी चिठी आतां आज छ ७ जिलकादी आली. कळावे. जयेनगरचे वर्तमान तर बावीस लाख रुपये जयापानीं लिहिले होते कीं पाठऊन देणे. नाहीतर आम्ही येतो. माधोसिंगाणे उतर सांगून पाठविले कीं तुम्ही काशास येतां, आम्हीच येतो. ऐसियासी जयापाचे वर्तमाण या प्रकारचें जाले, यामुळें तमाम रजपूत व जाट व मोगल वगैरे काये हिंदव, काये दक्षण खिरे? जाले आहेत. मारवाडकराणी धर्मयुध न केले. त्रिस्वासघात केला. श्रीमंताचे प्रतापेंकरून त्याजला शासन चांगलेच होईल. रजपूताचा विस्वास व दगाबाजी सर्व पूर्ववीच विनंती केलीच होती. परंतु कोन्हास विस्वास न आला ?
[१ जोड, सांधा.]
[२ अब्रू.]
[३ इस्तकलाली = जोर.]
लस्करचे वर्तमाण सरकारचे वकील व कविजंग निघाले. परंतु जवळ आले नाहींत. आल्यावर विनंती केली जाईल. हैदरजंगासी भुवणगीरचा किला मकान ज्यायेनिसैन करून दिधले. जाफरखानास त्याचा ऐवज दुसरे स्थळ योजिले. ऐसी खातरदारी त्याची आहे. सरकार मेहेकर वगैरे जागिरा दिधल्या. त्रिवर्ग एके सूत्रे आहेत हे विनंती.