Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.49: [November 1755] Dattaji Scinde's letter to the Peshwa describing the defeat his forces inflicted on Bijesing near Nagore.

Selections from the Peshwa Daftar 2.49

Language
Marathi

2.49

श्री.

शेवेसी विज्ञापना. विजेसिंगाचे लोकास जेसलमेरकर भाटी व पोखरणकर सामील होऊन जालोराकडे गेले. जालोरवाले व आपण एकत्र होऊन जोतपूरच्या फौजेवर चालोन आले. हे बातमी येताच जोतपुरी राजश्री जगनाथ पुरोहित यास व राजश्री जानराव वाबळे व सटवोजी बांडे या त्रिवर्गास जमावसुधा ठेऊन राजश्री संताजी वाबळे व माळजी वलद शहाजी सिंदे व आम्हा कडील हुजरातीचे लोक व राजश्री जिवाजी पवार व तुकोजी पवारचे लोक असे त्याजवर पाठविले. त्याची याची गाठ गोदोजेवर पडली. त्याचे याचे युध्ये जाले. विजेसिंगाचे लोकाचा मोड करून गोदोजेत घातले. त्याची माणसे मारलीं व जखमी जाली. बहुतच सिफिँदा करून गावांत कोंडला असे. आम्हाकडील लोक जुजाचे समइ जखमी वगैरे याचे वर्तमान तपसीलवार आले नाही. आल्यानंतर सेवेसी विनंती लिहून पाठऊं. गोदोजभोवत्या लोकांच्या चौक्या उभ्या राहून त्याची रसद व कही बंद केली असे. ते गोदोजेस गेले म्हणोनच वाचले, नाहीतर लुटलेच होते. त्याचे लस्करात धारण दोन शेर अडीच शेर जाली आहे. दोचौ रोजांत स्वामींचे तेजप्रतापें करून त्यास लुटून घेतील. वर्तमान आल्यानंतर सेवेसी तपसीलवार विनंती लिहिली जाईल. जोतपुरो पुरोहित व जानराव वाबळे व बांडे वगैरे राहून तेथील बंदोबस्त पूर्ववत प्रो करून आहेत. आम्ही नागोरचा बंदोबस्त राखून रागडे जागा जागा हुलड करून डोकी उचलली होती; त्याजवर फौजा पाठऊन जेथील तेथे गाठ घालून त्याचे उपमर्दन स्वामींचे तेजप्रतापे करून पारपत्य केले. नागोरात बहुतच तंगचाई जाली होती. परंतु राजे माधोसिंग यानी अनरुधसिंगाबरोबर फौज देऊन बिजेसिंगाचे मदतीस पाठविले म्हणून आजपर्यंत बिजेसिंगानी दम धरला आहे. नाहीतरी येथील कार्य मागेच जाले असते. स्वामींचे पुण्येप्रतापे करून अनरुधसिंगाचे पारपत्य येथयुक्त जाले. प्रस्तुत तों सलुखास येत आहे. येथे आल्यानंतर आमची त्याची भेट होऊन जो करारमदार कछव्याकडील व नागोरचा होऊन येईल तो तपसीलवार सेवेसी लेहून पाठऊं. कछव्याची फौज दिलीआसपास आली, आण आम्ही येथे राहावे ऐसे नव्हते. परंतु येथून गेल्यानंतर नागोरचा बंदोबस्त तुटतो यास्तव येथील येथेच मुकाम केला असे. नाहीतरी त्यासी गाठ घालून स्वामींचे आशिर्वादे करून त्याचे पारपत्य उत्तम रीतीने करून लुटून घेतला असता. सेवेसी श्रुत होय हे विज्ञाप्ति. *

[१ बुसीचा कारभारी.]

[२ वंशपरंपरा.]

[३ फजित.]

Discussed in (1)