Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.50: [28-10-1755] Jankoji Scindia writes to Bhausaheb about the defeat at Didwan he inflicted on Anirudhsing sent by Madhosing of Jaipur to help Bijesing against Jankoji.

Selections from the Peshwa Daftar 2.50

Language
Marathi

2.50

श्री.

श्रीमंत राजश्री दादासाहेब स्वामींचे सेवेसी.

विनंती सेवक जनकोजी सिंदे कृतानेक दंडवत विज्ञापना. सेवकाचे वर्तमान ता॥ छ २१ मोहरम मो॥ नागोर स्वामीचे असीर्वादे यथास्थित असें विशष. कछव्याची फौज पंचवीस तीस हजार अनरुधसिंग रामगड़ाहून कूच करून मारवाडचे सर्देस आले. तेसमई आपलेकडील सरदार राजश्री नरसिंगराव सिंदे व खानाजी जाधव व राणोजी भोईटे याणीं पछाडीवर युध्य करून आठ-नवसे माणूस मारले व हजार बारासे घोडे घेतले, हे वर्तमान पुर्वी सेवेसी विनंती लिहिली आहे. प्रस्तुत अनरुधसिंग दरकूच दिडवाण्याचे रोखे चालों लागला, तेव्हां लोकांनीं निकड बहुतच केली. अडीच तीन कोस तीन प्रहर चाले. छ १४ मोहरमी तीन कोस मजल दिडवाणीयास आला. तेसमई पाणी च्यार प्रहर मिळालें नाहीं. लोकांनीं युध्य करून दोनतीनसे माणूस मारलें व घोडे च्यारसे घेतले. तेथच हा कालपरयेत राहिला असे. पुढे कूच करून येऊ लागला तरी स्वामीचे तेजप्रतापें उत्तम प्रकारे पारपत्य होईल. राजश्री अंताजी माणकेश्वर अद्याप आले नाहीत * सेवेसी श्रुत होय हे विज्ञाप्ति.