Selections from the Peshwa Daftar 2.51: [6-11-1755] The whole letter is in Jankoji's own hand.
Selections from the Peshwa Daftar 2.51
- Language
- Marathi
2.51
श्री.
श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामीचे सेवेसी.
विनती सेवक जनकोजी सिंदे कृतानेक दंडवत विज्ञापना. सेवकाचे वर्तमान ता॥ छ १ सफर मो॥ नागोर स्वामीचे आशीर्वादें यथास्थित असे विशेष. येथील वर्तमान व जोतपुरकडील व अलोराकडील व कच्छव्याचे फौजेचे अनरुधसिंग दीडवाणियांत येऊन दाखल जाल्याचें, तपसीलवार पुरवणीपत्रीं सेवेसी विनंती लिहिली असे. त्यावरून विदित होईल. सारांस गोष्ट स्वामीचे तेजप्रतापें रांगड्यानी अधिक करावें येसें नाहीं. सर्वहि पादाक्रांत होतील सेवेसी श्रुत होय हे विज्ञाति.