Selections from the Peshwa Daftar 2.57: [13-1-1756] Malharrao Holkar writes from Indore to Sakharam Bapu at Poona that he had been unavoidably delayed in carrying out his intention of going speedily to the Deccan ; he was first going to prevent the mischievous moves of Madhosing.
Selections from the Peshwa Daftar 2.57
- Language
- Marathi
2.57
श्रीमोरया
राजश्री सखारामपंत गोसांवियांसी
अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्नो मल्हारजी होळकर दंडवत विनंति उपरी. येथील कुशल जाणून स्वकीये कुशल लेखन करीत आसिलें पाहिजे विशेष. पूर्वी आपणाकडून पत्रं येत गेली कीं देशास यावें. इकडील मोगलाचे पारपत्य झाल्यानंतर आवघ्या फौजा हिंदुस्थान प्रांते जाऊन बंदोबस्त होईल. यास्तव राजश्री गंगाधरपंतास वारंवार पत्रं पाठऊन त्यांस बोलाविले. त्यांनीं तिकडील सारश जसे तसे राखून इंदुरास आले. तदनंतर देशास यावयाचा विचार करून कूच करायवयाचा निश्चये ठराविला. हे बातमी माधोसिंगास कळताच फौज रवाना केली, ते चमले तीरास आली. मागाहून आपण खासा येऊन मालव्या प्रांतीचा आमल उठवावा, येसा प्रसंग विलक्षण देखोन इंदुरीहून कूच करून पीडावियापरीयेत आलो. माधोसिंगाची फौज पुढें आली आहे. त्याचे सिद्धकृत्य करून पुढें फौज रवाना करून आम्ही देशास सत्वरीच येत आसों. माधोसिंग वगैरे रजवाडियांचे पारपत्य ईश्वरकृपेने सर्व होऊन येईल. आम्हांस श्रीमंताचे पायावाचून दुसरा विचार नाहीं. परंतु इकडील प्रसंग विलक्षण जाणून महिन्याभराचा गुंता जाला. हें कार्य उरकून अतिसत्वर देशास येत आसों. सविस्तरार्थ श्रीमंताचे पत्री लेखन केले आहे. रा॥ छ १० रबिलाखर बहुत काये लिहिणें हे विनंति.