Selections from the Peshwa Daftar 2.58: [11-3-1756] In this and the following letter Jankoji writes to Naro Shankar from Marwar that he was soon starting to go to his help with his forces to effect order in the Doab.
Selections from the Peshwa Daftar 2.58
- Language
- Marathi
2.58
श्री
नक्कल बमोजोब असल.
राजश्री नारोपंत गोसांवियांसी.
[seal: अखंडित लक्ष्मी आलंकृत राजमान्य स्नो जबकोजी सिंदे दंडवत विनंती.]
येथील कुशल ता॥ छ १७ जमादिलावल जाणून स्वकीय कुशल लेखन करीत आसावें. विशेष. प्रांत अंतरवेदीत सरकारच्या आमलास दिलीकडील मोगलानें व गवारानें फिसाद केली. त्यास तंबी करावयासी राजश्री गोविंदपंत व राजश्री हरीपंत हे उभयतां फौजसह जाऊन, मोगलास मोडून लुटून घेतला. परंतु आमलाचा बंदोबस्त उत्तम प्रकारे जाला पाहिजे, सबब आपण आपल्या फौजेसवर्तमान प्रांतमजकुरी जाऊन मारनिले व आपण एकत्र होऊन एका विचारें राहून अंतरवेदीप्रांतचा अमल सरकारचा, सुरळीत खुलासा होय तो अर्थ करावा. श्रीमंत स्वामी यांणीं आपणास मारवाडांत रवाना केले म्हणोन अंतरवेदीत जावयासी आनमान केलात म्हणून ऐकिले. तरी इकडे आपण तूर्त न यावें. आम्हीच इकडील गुता लौकरीच उरकून आपणाकडे येतो. याउपरीं दिवसगत इकडे लागत नाहीं. कळले पाहिजे. बहुत काय लिहिणे हे विनंति.