Selections from the Peshwa Daftar 2.59: [15-3-1756] Jankoji's letter to Naro Shankar, saying that he was shortly coming back towards the Doab.
Selections from the Peshwa Daftar 2.59
- Language
- Marathi
2.59
श्री.
असल प्रमाणे नकल
राजश्री नारोपंत गोसांवी यासी
अखंडितलक्ष्मी अलंकृत राजमान्य श्नो जनकोजी सिंदे दंडवत विनंति येथील कुशल ता॥ छ १४ जमादिलावल जाणून स्वकीये कुशल लेखन करीत जावे विशेष. प्रांत अंतरवेद येथे सरकारचा अमल आहें त्यास हाली दिलीकडून वगैरे फिशाद जाली असें. त्याचा बंदोबस्त उतम प्रकारें जाहाला पाहिजे. सबब राजश्री गोविंदपंत प्रांत मजकुरी गेलेच असेंत. आपणहि आपल्या फौजेसहवर्तमान अंतरवेद प्रांते जाऊन, राजश्री गोविंदपंत व आपण सामील होऊन, येका विचारें राहून, प्रांत मजकूरचा अंमल सरकारचा खुलासा होय तो अर्थ केला पाहिजे. श्रीमंत स्वामी यांची आज्ञा अपणास जें, अम्हाकडे मारवाडांत कुमकेस जावें तरी तुम्ही तूर्त इकडे न येणे. इकडील गुंता थोडक्याच दिवसांत उरकॊन आम्हीहि प्रांत मजकुराकडेच येतों. कळलें पाहिजें. पाा जंळाळी व पाा बिलराम कासगंज प्रांत अंतरवेदी हे महाल पूर्वी राा बापूजी माहादेव व दामोदर माहादेव वकील याजकडे श्रीमंताकडून होते. हाली त्यांजकडून दूर करून राजश्री अंताजीपंत यांजकडे श्रीमंत स्वामीनीच दिल्हे अहेत. तेथे मानिलेनी अंमल राजश्री बाबूराऊ दामोदर यासी ठेविले अहेत. तेथील अमलाविसी जेणेप्रमाणे सांगतील त्याप्रमाणे साहित्य करून, सरकारचा अंमल खुलासा मशारनिलेकडे चाले तें केले पाहिजें. वकिलाची फिशाद दूर होय ते करावे. बहुत काये लिहिणें हे विनंति *
[* पत्र नारो शंकरास असावें.]