Selections from the Peshwa Daftar 2.60: [16-3-1756]
Selections from the Peshwa Daftar 2.60
- Language
- Marathi
2.60
श्री.
श्रीमंत राजश्री भाऊसाहेब स्वामीचे सेवेसी विनंति सेवक नारो शंकर कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना. येथील कुशल तागायेत फालगुन शुध्द पौर्णिमा स्वामीचे कृपादृष्टीकडून सेवकाचें वर्तमान यथास्थित असे. यानंतर सेवकाकडील वर्तमान तरी देसीहून दरमजलीनें झासीस अलो. महिनापंधरा दिवस राहून संस्थान सिवसे येथील मामलतीचा बंदबस्त करारवाकें स्वामीचे आज्ञेप्रमाणें केला. फौजेची समजाविश केलीं आणि मारवाडांत जावयाबद्दल कूच करून नरवरेंस अलों तों राजश्री समशेर बहादर याजकडून पत्र आले त्यासमागमे स्वामीचा हातररोखा अला. तेथे आज्ञा जें, राजश्री समशर बहादर यांस सामील होऊन जाणें. त्याजवरून राजश्री समशर वहादर याचा मार्ग यथे कांहीं दिवस पाहिला. इतकियांत राजश्री दताजी सिंदे याजकडून दोन पत्रें आली. त्याणी लिहिले जें. मारवाडचा सला जाहाला. इकडील गुंता उरकून आम्हीच त्या प्रांतास येतो. तुम्ही मारवाडांत न येणें. अंतरवेद प्रांती बखेडा जाहाला आहे. तिकडे जाऊन मुलु्काचा बंदबस्त करणें. त्याजवरून अम्ही येथून माघारे फिरोन अंतरवेद प्रांतास जात असों. फालगुन शुद्ध सप्तमीस येथून कूचं केले. वर्तमान सेवेसी कलावें याजकरिता लिहिलें. राजश्री दताजी सिंदे याजकडील दोन्ही पत्राच्या नकला करून सेवेसी पाठविल्या असेंत, त्याजवरून विदित होईल. पुढें स्वामीची आज्ञा होईल तेणेप्रमाणे वर्तणूक होईल. खिचीवाडेयाची मामलत स्वामीनी सेवकाकडे द्यावी ऐसा विचार होतां. परंतु ते समई मर्जी न पाहिली. मामलतीचा बंदबस्त मनास आणितां कांहीं नाहीं. पेस्तरसालापासून मर्जीस अलें तरी मामलत सेवकाकडे सांगावी. अज्ञेप्रमाणें बंदबस्त होईल. सेवेसी कलावें. बहुत काय लिहिणे हे विज्ञापना. *