Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.7: [1747] This news-letter seems to be addressed to the Peshwa from the Maratha camp near Jaipur. It describes the great terror and anxiety the presence of the Maratha forces had created in the mind of Madhosing.

Selections from the Peshwa Daftar 2.7

Language
Marathi

2.7

श्रीशंकर.

साहेबाचे शेवेसी विनंती विज्ञापना येसीजे. इकडील वर्तमान तरी फौजेचा मुक्काम मनोहरपुरा संनिध आला. मुलुकास उपसर्ग बहुत होत आहे व दिवान कनिरामजीचींहि पत्रे आलीं कीं मर्जी हाती नाहीं. त्याजवरून बहुत चिंतात्तूर जाली आहे. राजे कारभारी बहुत विचारात पडिले आहेत. याजवरी इभ्रत बहुत गोलप पडिली आहे. भट राजे सदाशिवजी याजकडे आजी रात्री साहा घटका गेलो होतो; तो बहुत विचारात बैसले होते. इतकियांत राजे माधोसिंगजी याचे हुजूरचे बोलावणे, चोपदार जलद आला कीं, बहुत जलद बोलाविले आहे. तैसेच तातडीने हुजूर भटजी गेले. आम्हासी बोलिले कीं दिढा प्रहरा दरबारास जातो, तुम्ही येणे, इतके बोलोन हुजूर गेले. दबाव बहुत पडिला आहे. साहेबाचे प्रतापे करून सर्व कामाचा निर्गम करून सेवेसी येत असो. आज्ञापत्र येईल त्याप्रोंच वर्तनूक होईल. राजे माधोसिंगजी यांनीं सावधता बहुत करविली आहे. अमेरीची बंदोबस्ती उत्तम करविली. जमाव किल्यावर पाठवितात. गुरसावक्षी याजला अमेरीस उतरावयासी पाठविले आहे. जागा जागा नाकेबंदी किलियाची व शहराची करितात. बरकंदाज ठेवितात. काली दो प्रहरा कबिला सर्व थोरले राणी देखील सर्व अमेरीस पाठविला. आपण सडे शहरात आहेत. आजि आशिर्वाद्रास हुजूर भोजनग्रहात गेलो होतो. दोन घटका हुजूर होतो. बहुत विचारांत राजे पडिले आहेत. हरसाहेजीस बोलावणे गेले आहे. त्याजपासी पाच सात हजार फौज आहे. दो चौ दिवसात तेहि दाखल होतील. आनखी हि तरतूद होते. परंतु त्याचा विचार सर्व साहेबास श्रुत आहे. दबाव सर्व प्रकारें उत्तम पडिला आहे. मर्जीप्रमाणें सर्व गोष्टी होईल. उदईक जो विचार होईल, येथील प्रसंग जो ध्यानास येईल, ते सविस्तर लिहून साहेबाचे सेवेसी पाठवीत असो. विशेष काय लिहिणे. कृपा वृधीमान केली पाहिजे हे विज्ञापना. राजश्री सटवाजी राजाले (?) याचे कारकून वसुलाचे ताकिदीस दिवान कनिरामजी बराबर आले. ते येथेच आहे भटजीकडे जात असतात. श्रुत जाले पाहिजे हे विज्ञाती.

[१ जयपुरच्या उ. ४० मैल.]

[२ भारी.]