Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.61: [16-3-1756] In this and the foregoing letter Naro Shanker writes from the North to the Peshwa that he was proceeding to the Doab in order to restore order in that province along with Bundele.

Selections from the Peshwa Daftar 2.61

Language
Marathi

2.61

वैशाख शुद्ध १०

श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामीचे सेवेसी.

विनंति सेवक नारो शंकर कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना. येथील कुशल ता. फालगुन शुद्ध पौर्णिमा स्वामीचे कृपाद्दष्टीकडून* सेवकाचे वर्तमान येथास्तीत असें. यानंतर सेवकाकडील वर्तमान तरी देसीहुन दरमजलीनें झासीस

[* मारवाडस्वारी उरकल्यानंतरचें पत्र.]

Ca 51-11 आलों. महिना पंधरा दिवस राहून संस्थान सींवायें येथील मामलतीचा बंदबस्त स्वामींच्या आज्ञेप्रमाणें केला व फौजेची समजावीश केलीं, आणि मारवाडांत जाण्याबद्दल कूच करून नरवरेंस आलों. तो राजश्री समशेरबहादर यांजकडून पत्र आलें. त्या समागमें स्वामीचा हातरीखा होता. तेथें * * * * * * त्याजसमागमें सामील होऊन जाणे. त्यावरून त्याच्या येणियाचा मार्ग काही दिवस पाहिला. इतकियांत राजश्री दत्ताजी सिंदे याजकडुन दोन पत्रें एक जासुदासमागमें व एक कारकुनासमागमें आली. त्याणी लिहीले जें मारवाडची सला जाहला. इकडील गुंता उरकून आह्मीच त्या प्रांतास येत असो. तुह्मी मारवाडात न येणे. अंतरवेद प्रांती बखेडा जाहला आहे, तिकडे जाऊन मुलुकाचा बंदबस्त करणें. त्याजकडील कामकाज उरकले. न येणे ह्मणुन लिहीले असता उगेच जावें हेहि उतम नाही. याजकरितां राजश्री दत्ताजी सिंदे याच्या पत्रावरून आह्मी येथून माघारें फिरोन अंतरवेद प्रांते राजश्री गोविंदपंताकडे असों. फालगुन वद्य सप्तमीस येथून कूच केले. वर्तमान सेवेसी विदित व्हावें ह्मणुन लिहीले असे. राजश्री दत्ताजी सिंदे याजकडील दोन पत्राच्या * * (नकळा करून) पाठविल्या असेत. त्याजवरून * (श्रु) त होईल. याजउपरी स्वामीची आज्ञा येईल तेणेप्रमाणें वर्तणुक होईल. अंतरवेद प्रांतीचे वर्तमान राजश्री गोविंदपंताची भेट जाहालियावरि सविस्तर सेवेसी वर्तमान लिहोन पाठउ. कळावे बहुत काय लि।।. हे विज्ञापना.