Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.62: [16-3-1756]

Selections from the Peshwa Daftar 2.62

Language
Marathi

2.62

श्री

श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामीचे सेवेसी

विनंति सेवक दत्ताजी सिंदे कृतानेक दंडवत विज्ञापना. सेवकाचे वर्तमान ता॥ छ ९ साबान मो॥ रुपनगर स्वामीचे आसीर्वादे यथास्थित असें विशेष. आज्ञापत्र छ १७ जमादिलाखरचे पाठविलें ते छ ३ साबानि सादर जालें. तेथें आज्ञा, बिजेसिंग राठोड याचा तह जालाच असेल. नसल जाला तरी हरप्रकारे कार्यभाग उरकावा. अतःपर स्वारीचे दिवस राहिले नाही. सत्वर कार्ये उरकावे म्हणोन आज्ञा. ऐसियास बिजेसिंगानी तह केल्याचे वर्तमान पूर्वी सेवेसी तपशीलवार लिहीलें आहे. त्यावरून विदित जाले असेल. आज्ञेप्रमाणे राठोडाकडील गुंता उरकून रूपनगरास दाखल जालो. मोचें लविले आहेत * * *

* * * ले आहेत. त्यास आम्हास हातधोंडियाचे तफावत आहे. राजश्री

समशेर बहादर येथें येऊन दाखल जाले. त्यांच्या आमच्या भेटी जाल्या.

त्यानीहि मोचें लाविले आहेत. अतःपर येथील कार्यभाग स्वामीचे प्रतापेकरून

थोडके दिवसात उरकोन मागाहून तपसीलवार सेवेसी विनंतीपत्र पाठऊन देऊ.

सेवेसी श्रुत होय हे विज्ञाप्ति.

---