Selections from the Peshwa Daftar 2.63: [9-5-1756] Jankoji Sinde to Peshwa from Rajputana, Marwar.
Selections from the Peshwa Daftar 2.63
- Language
- Marathi
2.63
श्री.
श्रीमंत राजश्री पंतप्रधान
स्वामीचे सेवेसी
विनंति सेवक जनकोजी सिंदे कृतानेक दंडवत विज्ञापना. सेवकाचें वर्तमान
तागायत छ ९ साबान मुकाम रूपनगर स्वामीचे आशीर्वादें यथास्थित असे
विशेष. आज्ञापत्र छ १७ जमादिलाखरचें पाठविलें तें छ ३ साबानी सादर जालें.
तेथें आज्ञा सावनुरांत राजश्री मुरारराव घोरपडे व मुजफरजंग आहेत. त्यास बाहेरून
मोर्चे लविले आहेत. बहुत तंगचाई धान्याची चारापाणीआदी करून जाली
आहे. सलाबतजंगहि श्रीकृष्णपेनें आम्हांकडेच येतील. सत्वरच कार्येंसिधी होईल.
आपणांकडील वृत्त तपसिलवार लिहिणें म्हणोन आज्ञा. ऐसियास मुरारराव यास
तंबी उत्तम प्रकारें पोंहचलीच आहे. इतके दिवसांत नवाब सलाबतजंग आपणां
सनिध आले नाहीं. इतकियांत त्यांचें सिस्टकृत्य जालें असेल. कदाचित
नसलें जालें तरी स्वामीचे पुण्येप्रतापापुढें त्यानीं काये करणें ? केल्या कर्माचा
फलत्कार पावले असतील किंवा पावतील. वरकड येथील वर्तमान अलाहिदा
पत्रीं कासिदाबराबर लिहिलें आहे त्याजवरून विदित होईल. प्रस्तुत रूपनगरास
छ २२ रजबीं सुक्रवारीं मोर्चे लाविले आहेत. मोर्चे हातधोंड्या मानी गेले
आहेत. राजश्री समसेर बहादूर वैशाख सुध शस्टी बुधवारीं येथें येऊन दाखल
जांले. त्याच्या आमच्या भेटी जाल्या. त्याचेहि मोर्चे लागले आहेत. अतःपर
स्वामीचे तेजप्रतापेंकरून येथील गुंता थोडके दिवसांत उरकोन मागाहून सेवेसीं
तपसीलवार लेहून पाठऊं * सेवेसीं श्रुत होय हे विज्ञाप्ति.