Selections from the Peshwa Daftar 2.64: [27-9-1756] Govind Ballal writes about his having settled his differences with the Vazir.
Selections from the Peshwa Daftar 2.64
- Language
- Marathi
2.64
श्री.
पो॥ छ १६ जिल्हेज.
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री तुबाजीपंत बाजी स्वामीचे सेवेसी पो॥ गोविंद बलाल कृतानेक सां. नमस्कार विनंती उपरी. येथील कुशल ता॥ आस्वीन शुध तृतीया जाणून स्वकीये लिहीत असिले पाहिजे विशेष. आपण पत्र पाठविले ते पावले. कुशलवृत कलोन संतोष जाला. यैसेच सदैव पत्री संतोषवीत असावे. आम्ही आपले आसो. या प्रांती वजीरानी बखेडा करावयाचा विचार केला होता. त्याजवरून आम्ही आगरियाकडे येऊन वजीरांसी सळूक करून माघारे फिरोन इटावाियाकडे आलो. इकडील बंदोबस्त करून देशास जाऊ. वरचेवर आपणास लिहित जाऊ. बहूत काय लिहीणे. कृपा लोभ असो दिजे हे विनंती.