Selections from the Peshwa Daftar 2.65: [1-9-1756] Jankoji Scindia writes to the Peshwa from Ujjain—all in his own hand—that he was soon returning to the South and execute the wishes of the Peshwa to his utmost.
Selections from the Peshwa Daftar 2.65
- Language
- Marathi
2.65
श्री
श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामीचे सेवेशीं.
विनंती सेवक जनकोजी सिंदे कृतानेक दंडवत विज्ञापना. सेवकाचे वर्तमान ता॥ छ ५ जिल्हेज मो॥ आवंतिकापुरी स्वामीचे आशिर्वादे यथास्थित असे. विशेष. आज्ञापत्र छ २० सवालचें पाठविलें ते छ १४ जिलकादी पावलें. तेथें आज्ञा, मिरजेहून दरकूच करून खासास्वारी छ २० सवालीं पुणेंग्रामीं दाखल जाली, व तुम्ही कोठे आलां, काय वर्तमान, कधी येणार, हे सविस्तर वृत लिहिणें, म्हणोन आज्ञा. ऐसीयास खासा स्वारी पुण्यास दाखल जाली हें वर्तमान एकोन परम संतोषावाप्ति जाली. आम्ही मो॥ मजकुरी लोकांचे समजाविसीचें कार्य चाली लाविलें आहे. तीर्थरूप राजश्री काका कोट्याकडे गेले आहेत. तेहि तेथील गुंता सत्वर उरकून येतील. तदनंतर कोट्याकडील सविस्तर वृत्त मागाहून सेवेसी लिहून पाठऊं व तीर्थरूप आल्यानंतर येथील गुंता राहिलेले लोकांचा उरकोन अति सत्वरच स्वामी दर्शनास येतो. सेवशी श्रुत होय हे विज्ञाप्ति.