Selections from the Peshwa Daftar 2.66: [15-10-1756] Antaji Mankeshwar's letter to Sagunabai, widow of Peshwa's younger brother Janardan Pant. She was at this time on a pilgrimage to Benares. The letter mentions where and how the Maratha Sardars in the North were occupied. Samsher Bahadar was at this time in Malwa.
Selections from the Peshwa Daftar 2.66
- Language
- Marathi
2.66
श्री.
पौ छ ६ सफर
श्रीमत् मातुश्री सगुणाबाई साहेबाचे शेवेसी
विनंती सेवक आताजी माणकेस्वर कृतानेक सां नमस्कार विज्ञापना. सेवकाचे वर्तमान ता॥ आश्विन वद्य सप्तमी मुकाम येमुनातीर सुखी आसो. साहेबी कृपा करून आसिर्वादपत्र पाठविले, पावोान संतोश जाला. सेवकाकडील वर्तमान, मारवाडची स्वारी करून ग्वालेरीस आलो. सिंदे उजनीस गेलें. तों दिलीहून पातशाहा वजीर आंतरवेदीत उतरले. सरकारच्या मुलकाची अमल उठवावा, याप्रा पत्रे वजिराची आम्हास आली. वकिलानी आम्हास लिहिले. राा गोविदबलाल याची दाहा पत्रे आली. जरी तुम्ही देशास गेले तरी आतरवेदीचा अमल उठतो. त्याजवरून बुनगे ग्वालेरीस ठेवून सडे फौजनसी अगरियास जाऊन, तीन महिने राहून, पातशाहा वजिराकडे वकील पाठऊन, त्याची आपला सल्ख केला. दाहा बारा हजार फौजनसी आम्ही त्याची चाकरी करावी, त्यानी सरकारच्या मुलुकास तिलमात्र ढका न लावावा याप्राा शफतपूर्वक लिहीलीपुसिली जाली. मग आम्हास आगरियाचे मुकामी पातशाहानी हती घोडा जवाहीर सीरपाव पाठविला. तो मस्तकी वदोन आम्ही फौजत ग्वालेरीस आलो. दसरा करून आता येमुनातिरास आलो. फौज बारा हजार आमची आहे. आम्ही पातशाहा वजिरापासी दाखल होतो. आतां बिघाडाची काडीमात्र चिंता नाही. आम्ही त्याजवल असल्यिाने कदापि अंतर पडत नाही. साहेबास कळावे. राा गोपालराऊ गणेश, हरी विठल, आजी दोन महिने देशास हा कजिया होताच निघोन गेले. राा गोविंद बलालहि आता सल्ख जालियावरी देशास आम्ही रवाना केले. नारो शंकर झासीस आहेत. समसेर बाहादर मालवियात आहेत. सिंदे उजनीपर्यंत गेले. तों मागें कोटीयाचा राजा माहाराव मृत्य पावला. त्यास पुत्र नवता. मग येकतांच सडी फौज करून दत्ताजी सिंदे कोटीयास जाऊ वेढले. चालीस लाख रुपये नजर केली. वीस लाख वसूल घेतला. विसाच्या बाँके घेऊन उजनीस आले. आता दिपावली करून देशास जाणार. श्रीमंत राा पंतप्रधान पुणीयातच आहेत. श्रीमंत राा दादासाहेब पुणीयातच आहेत. होलकर पुणीयातच आहेत. दिपावली करून हिंदुस्थानास श्रीमंत राा दादासाहेब व होलकर येणार. आम्ही आखेरसालपर्यंत पाताशाहापासींच आहो. तेथे सर्व हुकूम साहेबाचाच आहे. जे आज्ञा सेवकास करणे ते करीत असा. मी हुकुमी चाकर. घरचे खानाजाद आहो. साहेब खावंद आहेत. आज्ञा करावी. श्रीमंत राजश्री नाना साहेबाची आज्ञा छावणीस राहावयाची जालीच आहे. पुढे होईल वर्तमान ते सेवेसी वरचेवरी सविस्तर लिहीत जाऊन. कृपा करून पत्री सेवकाचा साभाल करावयासी स्वामी समर्थ आहेत. सेवेसी श्रुत होये हे विज्ञापना.
[१ करारनामा.]