Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.67: [19-12-1756] News-letter from Hingne to the Peshwa communicating the attitude of Najibkhan.

Selections from the Peshwa Daftar 2.67

Language
Marathi

2.67

श्री.

छ २६ रबिलाखर

श्रीमंत राजश्री पंतप्रधान

स्वामींचे सेवेसीं.

विनंति सेवक बापूजी माहादेव व पुरुषोत्तम माहादेव कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञाप्ति. येथील कुशल तागायत छ २६ माहे रविलौवल मुकाम इंद्रप्रस्थ स्वामीच्या कृपावलोकनेंकरून यथास्थित असे विशेष. इकडील वृत्त विस्तारें छ ११ रबिलावलीं विनंतीपत्रें पाठविलीं आहेत त्यावरून श्रुत होईल. हलीं येथील वृत्त. नजिबखानाचा प्रकार दिसतो कीं सर्वांसीं वचन प्रमाणाची तजविज आहे. याचें कारण हेंच कीं कांहीं शुज्यातदौले व नजीबखानामधें नाखुशी जाली आहे व कांहीं पातशाहाची मर्जी नाहीं कीं, नजिबखां इत्का दिलींत मुखत्यार राहे हे गोष्ट उत्तम नाहीं. यास्तव हे आपले बंदोबस्तास लागले आहेत. तथापि ठरेल ते विनंति करूं. वरकड वृत्त सविस्तर पुर्वणीपत्रावरून श्रुत होईल. कृपा केली पाहिजे हे विज्ञप्ति.

[१ नम्रसेवक.]