Selections from the Peshwa Daftar 2.68: [March 1757] The following letters describe the confusion in the North resulting from Abdali’s invasion.
Selections from the Peshwa Daftar 2.68
- Language
- Marathi
2.68
श्रीपांडुरंग
पु॥. राजश्री भास्कर मुरार स्वामी गोवे
विनंती उपरी. मुख्यपत्री व तुमच्या पत्री गुदस्तास कमी आदा खंडणी तपसीलवार लिहून पाठवणे, तरी गुदस्ताचा आकार असता तरी इतकी फिकीर करणेच न लागती. मग नारोपंतबावास वाईट कोण कशास म्हणते ? जमेस ठिकाण नाहीं. वसुलास ठिकाण नाहीं. बाकी काढून कबजे घेउन गेले ते समई कबजे न घ्यावी तरी ठाणी न येत. मुलुख न ये. अखर आश्वीन. रयेत खरीफ खाऊन गेली. पुढे रबीवर काये करावे, यैसे अडचणीत येऊन कबजे दिली. बाकी भरून देऊ. यैसे मुख्याजवल विनंती करितात. तरी बारा वर्षे मनमानेसी पैदास्त केली. आम्हास त्या मामलतीप्रमाणे बारा वर्षे न लगेत. चौ वर्षात दाहा वीस लाख देउ. काळवाधार भदावर दोन्ही तालुके भारी. अबदली मथुरेवर. हे पलोन येऊन झासीतील काबीले काढावे. कौली मुलुक मारावा हा कोठील इनसाफ ? जेथे गाव नाही, वस्ती नाहीं तेथील बाकी कोणास पुसावी ? ऐवज जमा वसुल नाहीं, मग बाकी कोणत्या हिशोबाची. आता ते म्हणतात जे बाकी भरून देतो. त्यास श्रीमंताकडुन आज्ञा करवावी. जे तिसाला देहविंदेवी जमा खंडणी त्याचा वसूल तरीखवार किर्दी सिलीकबंद आणणे. हिसेबमोजीब तिसाला बाकी निघेल ते येथे रुबरु लिहून पाठवितो. वसूल करितील. येणेप्रमाणे तिसाला हिशोब आणवणे. हा मजकूर श्रीमंत स्वामीस परिछिन्न सांगणें. ठाणी गेली. मुलकांत फितूर जाहला. रयत माल खाउन गेली. सिबंदी खर्च ज्याजती पडला. हे नुकसानी पुसणे. ते म्हणतील जे ठाणी गेली तरी आम्ही काये करावे. तरी याच्या स्वाधीन ठाणी असोन मवासानी कसी घेतली, आमच्या स्वाधीन केली असती ? मग जाती तरी आम्ही जाब करीतो पु॥. वरून कलेले.
[१ बरहुकूम]
[२ लुटारू.]