Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.69: [10-4-1757] One Keshavrao, who had fled from Delhi to save his life from the atrocities committed by Abdali in Delhi, writes to Raghunathrao how eagerly he expects Maratha rule to be established there.

Selections from the Peshwa Daftar 2.69

Language
Marathi

2.69

श्रीकृष्णो जयती.

श्रीमंत माहाराज राजश्री रघुनाथ राऊ दादा स्वामीचे सेवेसी.

शुभचिंतक स्नेहाकित राजा केशवराऊ कृतानेक नमस्कार विनंति उपरी. येथील क्षेम ता॥ छ २० माहे रजब मुकाम झासी जाणुन स्वकुशललेखनाज्ञा केली पाहिजे विशेष. आम्ही श्रीमंतांचे विलेचें (?) श्रीमंताच्या फौजा दिलीस आणविल्या व त्या जाबसालांत आम्ही आहो. याजकरितां आम्ही आबदालीपासी वगैरी लोकापासी बदनाम होऊन चुकलों. जरी आबदालीचे हाती पडतो तरी प्राण व धर्म न राहाता. याजकरिता दिलीची घरें दारें भरली टाकून, प्राणमात्र घेऊन निघालों ते झासीस येऊन राहिलों. आतां जोवरी माहाराजाचा जये होऊन अबदालीचे निरसन होये तोवरी दिलीस आम्हास जाणें होत नाहीं. तेव्हाच जावे जेव्हा माहाराजाचे अधिष्ठान दिलीस होईल व आम्हास माहाराज बोलाऊन हवेलीया व जागा व खिदभेंता यथापूर्वक देवितील. हा विस्तार राजश्री बळवंतराऊजी सांगतील त्याप्रमाणें करून मजला लिहावें. तोवरी झांसीस आहे. अबदाली परतून गेला. मेला म्हणताती. स्वामीचे पुण्यप्रतापे हेहि होऊ शके. विश्वाचे भाग्य असेल तरी असेच होईल हे विनती.