Selections from the Peshwa Daftar 2.70: [26-4-1757] Dattaji Scindia, at this time in the Deccan, asks the fort of Shivner from the Peshwa as a place of safety for keeping his family. This proposal apparently did not fructify, since later on the Scindias established their posts at Jambgaon.
Selections from the Peshwa Daftar 2.70
- Language
- Marathi
2.70
श्री.
छ १९ साबान.
श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामीचे सेवेसी.
विनंती सेवक दत्ताजी सिंदे कृतानेक विज्ञापना. सेवकाचे वर्तमान छ ७ साबान पर्यंत यथास्थित असे विशेष. आम्ही लस्करांत असतां स्वामीस विनंती केली कीं एक किला मुलें माणसे ठेवावयास आम्हाकडे द्यावा म्हणोन विनंती केली. स्वामिनीहि मान्य केले, कीं हरएक जागा नेमून देऊं. येसियांसी आम्हापासून
१ सेवा.
जवळ किला सिवनेर आहे. तर कृपा करून ते स्थळ आम्हाकडे नेमून दिल्हे पाहिजे, म्हणजे तेथील बंदोबस्ती आज्ञेप्रमाणे केली जाईल. सेवेसी श्रुत होय हे विज्ञाप्ती.