Selections from the Peshwa Daftar 2.71: [1757] The writer Badrinath describes the havoc created by Abdali, adding that he did not even spare the Pathans (Rohillas) although they were responsible for calling him in.
Selections from the Peshwa Daftar 2.71
- Language
- Marathi
2.71
श्रीकृष्णो जयती.
सेवेसी राव बदरीनाथ सां नमस्कार विनंती उपरी. तीर्थरूपाचे लिहिल्यावरून सर्व वर्तमान विदीत होईल. महाराजाचे सेवेसी विनंती करणे ते करीत असतों. हिंदुस्थानचे काम पातशाही हलकी जाली, याकरितां बिघडत चालले. अबदाली प्रबळ होऊन लुटून गेला म्हणून पठाण मात्र चहुकडे उपद्रव करितात. परिणामी अबदाली यांसहि भक्षील. एका पठाणास तरी जातीवेळेस भक्षिले. निजाबतनामे रुहेला येती वेळेस लाहोरचे वाटेवर अबदालीस पहिलेच जाऊन भेटून आपला गढ किला व मुलूक त्याचे हातातून वाचविला होता. जाती वेळेस अबदालीने त्या गढास मोरचे लाऊन घेऊन वीसा लक्षाची दौलत घेऊन पुढें गेला. दुसरे महमदशाहाच्या बायका मलिकाजमानी व साहेबमहाल वगैरे त्याजबरोबर गेल्या. दोनशत ऊट मालाचे आपले समागमे दिलीहून नेले ते द्रव्य व जवाहीरहि अबदालीचेच कपाळचे होते. ते गेले. अबदालीचे सरकारांत अठावीस हजार ऊट व हाथी व खेचरे व गाढवे व बईल व छकडे व गाड्या व यैारैदी मालाची लादली गेली. या शिवाय ऐशी हजार स्वार प्यादे त्याजसमागमे होते. त्यांही नेले ते वेगळे. च्यार शहरें दिली, आगरा, मथुरा, वृंदावन सारिखी त्यानें धून नेली. तेव्हां इतकी बारेबारदार त्यास लागली म्हणोन कोणाचे घरी घोटा ऊट त्यानें सोडला नाहीं. परिborderटाचे गाढवहि सांपडले तेहि घेऊन गेला. त्याचे स्वार जातीवेळेस पाईं गेलेत. आपले घोड्यावर माल लादून घेऊन गेलेत. तोपखाना जाटाचे गढ घेयास आणिला होता, तोहि बईल मालाखाले लादले गेले म्हणून सोडून गेला. तो जाटाने आपले गढात नेला. दिलीमधें कोणापासीं तरवार सोडली नाहीं. तोपखाना पातशाही किल्याचे बुरुजावर होता तो निवडून घेऊन गेला. बाकी
[१ *यारीद f यारथा=लहान घोडे.]
[२ ओझीं वाहून नेणारे.]
Oa 51-12 CC-0. Agamnigam Digital Preservation Foundation, Chandigarh
खाले टाकिला व मोडला. हिंदुस्थानचे पठाणाचाहि तो आश्र१नाव नाहीं. दोन दिवस वाट कळायाकारणे व भेद पुसायाकारणे जो कोणी येऊन भेटला त्यास जवळ येऊ दिधले. पठाणाही त्याचे नावाने आपले आपले तालुकीय़ाकडे उपद्रव करून मुलुक लुटला. अबदाली जवळ त्याचे काहीं चालत नाहीं. ते याचेही भक्षक आहेत. कोण्ही आणीक हातास न आला तरी यांसच खाणार असे ते आहेत. तरवारेचे बल त्याजमध्ये फार. कावादावा त्यांस येत नाहीं. नीट चाळीस कोस धावणारे. महिन्यामराच्या सीव्या नां२ना खाणार आहेत. यावरशी तरी गेलेत. पुढे यावेसे आहेत. याचा उपाये माहाराजच करतील. याच वेळेस महाराजांही नीट कामाचा तरदूब केला असता तरी पुढें सोपे होते हे विनंती. *
Discussed in (1)
- Fall of the Mughal Empire — Sarkar 1932, English