Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.72: [Beginning of April 1757] The letter mentions news of the reverses Abdali met in his southern course and how he returned discomfited not having received a pie from the Jat.

Selections from the Peshwa Daftar 2.72

Language
Marathi

2.72

श्री

सेवेसी विज्ञापना. आतांच बातनीची जोडी आली. अबदाली दिलीसनिध झिला३वरी गेला. तेथून कूच पुढे जाले. या उपर इकडे बतनीची चिठी आली सुरजमलाचे सांडणीस्वारहि झिलावरील कूच पलीकडे गे लीयावरी आली. या उपरी मग राजे जुगुलकिसोर व अबदालीचा येलची साता लाखा साठी ठेवून घेतले होते त्यास कपर्दिका न देतां वाटे लाविले. कवडी न दिली. त्यानी सुरजमलावळ कौल मागितला कीं आम्हास दिलीपर्यंत दगा न करावा आणि गेले. गाजदीखान अगोदर आलमगीराचे दोघे पुत्र हाताखाले तोराँ घालून अंतरवेदींत गेला. त्यासमागमे गाजदीखानाची फौज खासगत चार हजार होती. दोन हजार फौज अबदालीची चौकीस त्याजवरी होती-ते गाजदीखानापासून निघोन अबदालीस मिळावयास गेली. यानी चार हजार फौजेनसी कूच करून फरकाबादेकडे गेले. बहुधा आलमगीराचा त्याचा बिघाड. दोघे पुत्र तोरे हती धरून गेला. अबदालीचा सरदार जगबादखान दोन हजार फौजेनसी वजिरावरी चौकीस होता तो निघोन गेला, याप्रमाणे बातनीची चिठी आली. पुत्र खजिना घेऊन जात होता तो आला. जाटाने काही लुटिला. अबदाली खासा मृत्य पावला यैसे तहकीक नाही. परंतु कोणास पधरा रोज दर्शन नाही. तोफा मातबर व डेरे भरले टाकून दरकूच गेला याजवरून सर्व बोलतात. सवेशी श्रुत होय हे विज्ञापना.

[१ आश्नाव=स्नेह, सख्य.]

[२ नानाप्रकारच्या शिव्या हा अब्दाली महिनाभर खाणार.]

[* ही अब्दालीची तिसरी स. १७५६-५७ ची स्वारी असावी. अब्दालीने केलेली लूट.]

[३ झील नावाचा तलाव.]

[४ शह, सूत्र.]