Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.73: An autograph letter of Sakharam Bapu, most likely addressed to Raghunathrao. It refers to some ambassador who had come from the Emperor.

Selections from the Peshwa Daftar 2.73

Language
Marathi

2.73

श्री

विनंती उपरी. आपण चिठी पाठविली. तेथें पातशाकडील ग्रहस्त आला आहे, तो उद्या रवाना करावा म्हणून लिहिलें. ऐशास रा॥ विठलपंत जेथें आहेत तेथेंच आहेत. त्यास बळाऊ गेले ते येतो म्हणून उत्तर आले. आपण कोस आदकोस कूच करितो म्हणून लिहिले त्यावरून आम्ही सुस्त राहिलों. बरें चिंता काय आहे ? आपण आज पालखीत बसोन सत्वर यावें. अंबारीहि आणावी. हे काम आजच करावें. दिवस जातो. उद्या आपल्या आमच्या विचारें जेथे राहावयाचें होईल तेथें राहूं. पाऊस नाहीं. चौघटकाचें काम आहे. आळस न करावा. जरूर यावें. मार्ग पाहतों. जरूर यावें. हे विनंती.

साहेब रायास निरोप आपण आल्याउपरी देऊ हे विनंती.