Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.74: [16-5-1757] Purushottam Mahadeo reports to Raghunathrao the keen disappoint-ment that the Vazier felt on account of the changes that Raghunathrao effected in the management of the Emperor's affairs.

Selections from the Peshwa Daftar 2.74

Language
Marathi

2.74

श्री

श्रीमंत राजश्री दादा साहेब

स्वामीचे शेवेसीं.

विनंती सेवक पुरुषोत्तम माहादेव कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञाप्ति. येथील कुशल तागायत छ २७ माहे साबान मुकाम इटावा श्रीयेमुना उत्तरतीर स्वामीचे कृपावलोकनेंकरून यथास्थित असे विशेष. इकडील वर्तमान पूर्वी सेवेसीं विनंती पत्रें पाठविलीं त्यावरून वृत्त श्रुत जालें असेल. हालीं स्वामीचें आज्ञापत्र आलें त्यांत मजकूर कीं पठाण रोहिले व वजीर यमुना दक्षिणतीर आले असले तर मजल दरमजल सत्वर येणे. जर उत्तरतीरीं असले तर न आणनें. तुम्ही निरोप घेऊन उठोन येणें. त्यास फरूकाबादेहून कूच करून रोहिले पठाण व वजीर फौजासहित इटावाियास यमुनातीरीं दाखल जाले. उतरावयास नावा राजश्री बालाजी गोविंदाकडून आणविल्या आहेत. इत्कियांत स्वामीचें आज्ञापत्र आलें. त्यावरून सेवकानें कूच केलें. त्यास वजीरानी आपला पुत्र पाठऊन आम्हांस फिरून आणून मुकाम करविला, आणि आम्हांसी बोलिले की म्या कोणेप्रकारें दोही सरदारासी हमैवार करून श्रीमंताचे चाकरींत रुजू केलें. आणि जवाहिरसिंगानें दाहा लक्षाची हुंडी अहमदखानास व हार्फीजास नजिबखान व नागमल व दलेलसिंग यांचे मारफतीनें पाठविली. असेंहि असतां आम्ही त्याकडे लागूं न दिधलें. श्रीमंत स्वामीचे शेवेंतच रुजू केलें. शाहाकडून व फिरंगी पातशाहाकडून या सर्वांसी तोडून स्वामीकडे यासी केलें असतां स्वामीचा हुकूम या प्रकारें आला. त्यास मी तों स्वामीचा दोस्त आहे आणि स्वामीनी हिंदुस्थानचा बंदोबस्त केल्यावाचून दक्षिणेस जावें हें योग्य नाहीं. या गोष्टींत आपला दबाव राहत नाहीं. म्यां बहुत राजकारणें दुरुस्त केलीं आहेत. राजे माधोसिंगास लेहून त्याची फौज स्वामीकडे शामसिंग नामें सरदार पाठविला तो स्वामीपासीं पावलाच असेल. माधोसिंगाचें खत वजिरास आलें तेहि सो. त्यानी पाठविलें आहे. त्यावरून श्रुत होईल. फिरंगियाकडे व पातशाहाकडे माझा भला माणूस गेला होता. तो सर्व कामें पोख्तगी करून शंभर स्वार व शंभर प्यादे तेलंगे घेऊन फरुकाबादेस आला. येका दो दिवसानी मजपासीं येईल. दुसरें वजीरानी सांगितलें की श्रीमंत दिलीकडे चालतील तर विसा लक्षाची टीप त्यानीं आपले खलित्यांत घालून पाठविली आहे. हे मान्य करून स्वारी ये प्रांती ये ते करावें. तिसरे अहमदखानासीं व हाफिजासी करार मदार करून घेतला कीं श्रीमंत स्वामी जाटाचे मुलकांत आले म्हणिजे जाटाचा मुलुख जप्त करून सरकारांत दाखल करूं आणि पठाण रोहिलेहि त्या मुलकाचे थोडसे उमेद्वार आहेत. स्वामीचें आज्ञापत्र आलें त्याजवरून वजीर बहुत दिलगीर जाले पनासा हजाराची रुपयांची तयारी करून येथवर आला. पुढें निगादास्त ज्यारी आहे. नावा येतील त्या वेलेस यमुना उतरून सेवेसीं हजर होऊं. हें राजकारण बहुत मेहनतीनें केलें आहे. श्रीमंत जर या रोखें येतात तर सर्वहि राजकारणें उत्तम होतील. नाहींतर भगवत इच्छां या प्रमाणें त्यानी सांगितलें. व विसा लक्षाची टीप लिहून दिधली ते सेवेसीं पाठविली असे. यांचें समाधान करून आम्हीं निरोप घेऊन सेवेसीं येतों. सलाह असेल तें करणार स्वामी समर्थ आहेत. वजिरानी इतका विस्तार लिहिविला यास्तव सेवेसी विनंति लिहिली असे. कृपा करणार स्वामी समर्थ आहेत हे विज्ञाप्ति.

[१ हमवार = प्रसन्न.]