Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.75: [19-6-1757] Sadashivrao writes from Poona to Raghoba in the North asking him to exact the various contributions mentioned in the paper from the various ruling chiefs in Malwa and Bundelkhand. The Peshwa, it seems, had levied special contributions to meet the expenses incurred in dri..... Abdali.

Selections from the Peshwa Daftar 2.75

Language
Marathi

2.75

श्री.

पौ छ १४ सवाल

पु॥ चिरंजीव राजश्री दादा यासी आशिर्वाद उपरी. हिंदुस्थानांतील राजे यास कर्जपटीच्या ऐवजाविसी पत्रे पाठविली आहेत.

२००००० वसूल नि॥ नारोशंकर----

१००००० बोडसेकर राजा

१००००० दतियेकर राजा

२०००००

५००००० जगतराज बुंधेले वसूल नि॥ हरी विठल

६२५००० अमानसिंग बुंधेले वसुल नि॥ गोविंद बलाळ

१००००० भुपाळकर वसुल नि॥ रामचंद्र बलाळ भूसकुटे

५०००० खीचीकर राजा वसुल नि॥ विष्णु महादेव

१००००० मंडलकर राजा वसुल नि॥ महिपतराव कवडे

१९७५०००

येणे प्रमाणे पावणे सोळा लक्षाची पत्रें राज्यांस व सरकारचे कमाविसदारास लेहून पाठविली आहेत. त्यास कमाविसदार व राज्याकडील वकील आपणाजवळ आलेच असतील. त्यास कर्जपटीचा करार मदार करून वसूल घ्यावा. आपणाजवळ कोणी आले नसतील तरी या प्रमाणे पत्रे पाठऊन ऐवज वसूल करवावा. खीचीकरास राजश्री मल्हारबाकडून रगडून सांगितल्यावर रुपये देतील. * यावर ताकीद करावी. कांही कार्य होईल. छ १ सवाल हे आशिर्वाद