Selections from the Peshwa Daftar 2.76: [20-6-1757] Govindpant Bundele proposes to Raghunathrao to come in person in the Doab so as to create an impression upon the rebels and befriend the Vazier.
Selections from the Peshwa Daftar 2.76
- Language
- Marathi
2.76
श्री.
पौ ४ शौवाल
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री सखारामपंत बापू
स्वामींचे सेवेसी.
पो बालाजी गोविंद कृतानेक सां नमस्कार विनंती उपरी. येथील क्षेम ता २ शौवाल मुकाम मौजे बरोली पो भुगांव जाणून स्वानंदलेखन कीजे. विशेष आपण छ २८ तारखेच पत्र पो ते छ मारी पावले. तेथें लिहिलें कीं छ २९ रमजानी काँसेंगजावरी मुकाम होईल. सुजावतदौले याजकडील वकील आपले यैसे त्याजकडेस पाठविले आहेत. आपण फरकाबादेस येतो. तुम्ही फौजेच्या दवावाने आपले काम करून घेणे. त्यास बहूत उतम आहे. फौजेच्या दवावानें काम करून घेऊन जें होईल त्यांस चुकत नाहीं. त्यांस येक काम जरूर करणें. रूरूचा राजा आहे. त्याचे त्याणे कुल पा फफूद परगणा घेतला. निवल पंथरा गांव राहिले. त्यास तमाम गढया बांधल्या. तैशाच सर्व जागा आह्मापासी सरकारी पथके आहेत. या फौजेने वरीसभर जुजल्याने हे काम होणार नाहीं. आपले येणे फरकाबादेस जाले म्हणजे हे काम सहजात व्हावे यैसे आहे. कदांचीत न जाले तरी येक मज्ल इकड्रेस रूख केला म्हणजे सर्व जाले यैसे आहे. आपण इकड्रेस यावयाचे केले. येणेकरून नेकसहि जाला आणि सरकारी कामहि होईल. सुजातदौला पैकाहि देईल आणि सोबतीहि होईल. तेणे करून आपली मातबर कामे होतील. इकडील रागडेयाचे वकील तमाम लहान थोराचे लस्करी बसले आहेत. फौज कोणकडेस जाती हैं पाहातात. रूरूच्या राज्यानी आपले वकील राजश्री अताजीपंत नानाकडेस पाठविले आहेत म्हणून कळले. त्यास त्याणे चार परगणे दबाविले आहेत पा फफूद व पा तालगांव व देवमली व सकतपुर व पा इटे पांच परगणेयाची जागा दबाविली आहे. तमाम गढया बांधल्या आहेत. फरकाबादवाले यांची हिमाइती बहूत. तैसीच लस्करांतहि माणसे वकील पाठविले आहेत. असो इकड्रेस आलियावरी भेटीस येईन. सर्व वर्तमान सांगोन, त्याजवरून ध्यानास येईल तैसेच सर्वत्र जाले आहे. नवाब सुजावतदौले यांजकडीलहि वकील आपणाकडेस जावयासी आला. त्यास अजी प्रातःकाळी रवाना केला. समागमे पंचवीस राऊत देऊन त्यास हाली आपणाकडून पत्र आले त्याजवरून त्यास इकडून आपणाकडे पाठवून देऊ. तो सीमहेर याच्या सुमारे गेला त्याजवरून त्यास बलाविला. वरकड मागाहून लिहून पाठवून देऊन जे काम होईल त्यास चुकत नाहीं. लिहित जाईन कळावें. आणीक जे वर्तमान होईल ते मुजरद जोडी पाठवितो. त्यावरून कळेल. आपण कासद जोडी पाठविली ती पाचवे रोजी पावली. बहूत काय लिहिणे. कृपा लोभ असो दीजे हे विनंती.
[१ कासगंज.]
[२ दबाव.]
Discussed in (1)
- Fall of the Mughal Empire — Sarkar 1932, English