Selections from the Peshwa Daftar 2.77: [1757] This paper contains four alternative proposals addressed by Najibkhan to Malharrao Holkar on the subject of effecting a reconciliation between Abdali and the Marathas.
Selections from the Peshwa Daftar 2.77
- Language
- Marathi
2.77
श्री.
पु॥ श्रीमंत राजश्री दादासाहेब स्वामीचे शेवेसी.
विज्ञाप्ति ऐसिजे. नजीबखानाने अबदुल अहमदखान याजबरावर राजश्री सुभेदारास सांगून पाठविलें त्याचा तपसील कलमे ४.
१ मी तुमचा फर्जंद आहे. जैसी आज्ञा कराल तैसी वर्तणुक करीन. तुमचा उपकार मजवर बहुत आहे, आणि तुम्ही मजवर तरवार बांधावी हे गोष्ट उतम नाहीं. मजला सांगाल तर येमुना पार उतरोन जाईन. दिली व मुलूक ज्याचे स्वाधीन करावयाचा असेल त्याचे हवाला करावा. कलम १
१ दुसरे, मजला आज्ञा करावी. मी शहाकडे जाईन. तुमचा व त्यांचा सळूक ठराऊन हदहेदूद बांधून ठीक करीन. शहाने आपले हादेत असावे. तुम्ही आपले हदेत हिंदुस्थानचा बंदोबस्त करावा. कोणे गोष्टीचा कजिया राहणार नाहीं. कलम १.
१ तिसरे, माझा ल्योंक जाफंतेखान पांचा साता हजाराफौजेनसीं तुमच्या जवळ ठेवीन. तुम्हासी मजसी संशय किमपि नाहीं. कलम १.
१ चौथे, इतक्या गोष्टीवर तुम्ही राजी नसाल, लढाईच करावी हाच मनोदय असल्यास पारचे रोहिले वगैरे सर्व मिळून एकदा लढाई उतम प्रकारे करून मग ज्यास श्री यश देईल तो सर्व राज्य करील. कलम १
४
सदरहु कलमे ४ या प्रमाणें सांगून अबदुल अहदखानास पाठविले आहे. तो राजश्री सुभेदारापासीं जावयास निघाला. तो जाटाचे खातरदास्त बहादरगडाहून सुभेदारांनी माघारे फिरविला. श्रुत होय. कृपा केली पाहिजे हे विज्ञप्ति.
[१ मर्यादाहद.]
[२ जवेताखान.]