Selections from the Peshwa Daftar 2.78: [1757] Vithal Shivdev's letter to Raghunathrao describing measures to oppose Abdus Samad Khan, Abdali's lieutenant, posted at Sirhind, who was threatening from the North.
Selections from the Peshwa Daftar 2.78
- Language
- Marathi
2.78
श्री.
सेवेसी विज्ञापना. आज्ञा घेऊन स्वार जालियावर सालेमार बागावर मुकाम केला. समंदखान याची आवांईचे वर्तमान होते. त्यास येथे आलिया सोनपत पानपते पासून बातम्या आल्या कीं सरहंदे पावेतो फौज कोठे नाहीं. करनाळेस हजार स्वार आले जैसे वर्तमान होते. परंतु त्याचे ठिकाण लागत नाहीं. विशेष शहरचा मजकूर मोगलपुऱ्याकडील अनुसंधान आहे. ते गोष्टीस गाजदीखान, नागरमल पाहिजेत. त्यास पाठवावयाची आज्ञा करावी. येथे एक दोन मुकाम करूं. जी तरतूद होईल ते करूं. ये गोष्टीचे उत्तर सत्वर पाठवावयासी आज्ञा करावी. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना. बहादूरखान बलोच यासहि पाठवावयाची आज्ञा करावी हे विज्ञापना.