Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.79: [3-7-1757] Antaji Mankeshwar writes to the Peshwa that order had been restored in the Doab and mentions some pointed details of the Imperial situation after Abdali had left Delhi in the summer of the year.

Selections from the Peshwa Daftar 2.79

Language
Marathi

2.79

श्री.

श्रीमंत राजश्री पंतप्रधान तथा राजश्री

भाऊसाहेब स्वामींचे शेवेसी

विनंती सेवक आंताजी माणकेंस्वर कृतानेक सांा नमस्कार विज्ञापना. सेवकाचे वर्तमान ताा अशाढ वद्य २ द्वितीया मुकाम आनुपशहर गंगातीर येथून गडमुक्तेंस्वर बारा कोंस यथास्थित असे विषेषे. आबदाली गेला. श्रीमंत जेपुर प्रांती राहून अंतरवेदीतील आमल उठला तो बसवावा, नजीबखानाचा मुलूक जत्फ करून नजीबखान दिलीहून काढावा, या उदेश राा सखारामपंत बापूंस श्रीमंत दादासाहेबीं तेवीस हजार फौजनसी जेपुर प्रांतीहून रवाना केले. समागमे विठल सिवदेव, आम्ही, हुजरात, गंगाधर येकवंत आलो. अगरियांस येऊन जाटाकडील बाकीचा फडशां करून अंतरवेदीत येऊन आपला आमल बसविला. व गाजदीखान शाहाजादे गुंगा उतरून पार गेले. सुज्यातदौला व ते लढाईस उभे राहिले. आम्ही सुज्यातदौलाचा उपराला केला. त्यामुळे वजिराने सलुख करून मागती पार आम्हाकडे आला. आम्ही दरकूच गडमुक्तेस्वराकडे जाऊन पातशाहाचा मुलूक नजीबखानाने दाबला तो खालसा करून मग नजीबखानास दिलीतून काढू. नजीबखान आबदाली दोन नाहींत. आबदालीचा पुत्र लाहोरी आहे. नजीबखान त्यांचा होऊन दिलीत आहे. वजीर पातशाहा आम्हाकडे आहे. सुज्यातदौला आपले जागा आहे. आम्हास सामील व्हावयाचा नाहीं. हे साद्यंत सात बंद तपशीलवार वर्तमान सविस्तर आजी साहा दिवस वर्तमानपत्रं लिहून मुजरद माणसे ३ तीन रवाना केलीं. तीं सेवेसीं पावली असतील. त्याजवरून सर्व स्वामींच्या ध्यानास आलें असेल. याजकरिता हाली मागील तपसीलवार वर्तमान लिहिले नाहीं. अंतरवेदीत काडीचा फितुर न राहिला. सुज्यातदौलाची लढाई वजिराची होऊन दिल्ली. वजीर भारींच होता, त्यास लुटून घेता. परंतु सुभेदाराची मर्जी सुज्यातदौलाकडे म्हणोन त्याचाच उपराला केला. त्याने वजीर दबला. सलुख केला. वजीर शाहाजादे आहमदखान पठाण आम्हाकडे आले. येकादोदिवसीं भेटतील. स्वामीस कळावे, यांजकरितां लिहिले असे. [ अपूर्ण ]

Discussed in (1)