Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.80: [4-7-1757] Balaji Bajirao's autograph letter to Raghoba asking him to befriend the Jat and lead an expedition towards Patna next year for obtaining funds.

Selections from the Peshwa Daftar 2.80

Language
Marathi

2.80

(पो) छ ७ जिलकाद.

श्री.

पु॥ चिरंजीव राजश्री दादा यासी आशिर्वाद उपरी. अबदाली दिलीपलीकडे जलदीने गेला म्हणुन जलद लिहिले दिलीहून मनसारामाचे आले. आपलेहि पत्र रवाना जाहाले असेल. कासीद सरकारचे चाकर चालत नाही. सखत ताकीद असावी. आपली समीपता होत चालली. जाट जबरदस्त पाहून शहाणपण करून गेला. असो. यदा जाटाने बहुत केली. सर्व प्रकारें कृपाच दाखवावी. मारवाडांत कांही साध्य नाहीं. दिलीस तो कांहीच नाहीं. जयनगरची मामलत करून मोकळे होऊन आपले मुलुखची देखरेख कमाविसदाराचे पुर्ते तहकीक बारीक मोठे वर्तमान मनास आणावें. तुम्ही जेथे आहा तेथे आसपास पैका मिळावयाची जागा राहिली नाहीं. याउपर वाजतबरसात पटणे जरूर घेतले पाहिजे. मल्हारबाची जाटाची चित्तसुध अंतरी नाहीं. कदाचित कलह इच्छितील तर परिणाम होणे नाहीं. यंदाचे वर्ष तो सहसा जाटासी विरूद्ध न करावें. दत्तबास परिछीन एक दोनदा ल्याहावें कीं, अबदालीसाठीं जलद तुम्हास बोलविले होते, तो तूत गेला, याउपर अमदाबाद घेऊन आपण यावे, ऐसे जरूर आपण लिहिलें पाहिजे.