Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.81: [17-7-1757] Nanasaheb's letter to Raghunathrao containing strict instruction for recovering all the dues from the Doab and not to accept excuses from Damodar Mahadeo Hingne.

Selections from the Peshwa Daftar 2.81

Language
Marathi

2.81

श्री.

पो २९ जिल्काद

आशीर्वाद उपरी. राजश्री दामोदर महादेव यांजकडे (काल्पी ?) पीच्या महालची बाकी आहे, त्याचा तपशील आलाहिदा पुरवणीत लिा आहे. त्यास मारनिलेकडे बाकीचा यैवज येणे त्यास ते म्हणतील कीं रा अंताजी माणकेश्वर याची वरात आम्हावर जाली आहे. त्या यैवजांत हा यैवज मजुरा मागो लागतील. ऐसियास मारनिलेकडे ऐवज आठा लक्षाची कुऱ्हाज्यानाबादची वरात व पटाणाबाबद आठरा लक्ष व जैनगराबा पाऊण करोडीचा वसूल त्याकडेच आहेत. त्यांतहि जाला आहे. आणखी किरकोळ ऐवज त्याजकडे जमा होतच आहे. या खेरीज पातशाहा दरमहा फौजेस रोजमरेयास ऐवज दीड लक्ष रुपये दरमहा देतात ऐसे वर्तमान आहे. + + + ऐसे कितेक ऐवज त्याजकडे आहेत. त्या ऐवजी अंताजी माणकेश्वर याचे वरातेचा ऐवज पावेल. या ऐवजात मजुरा द्यावयाचा नाहीं. अंतरवेदीच्या ऐवजास मारनिले हातपाय लावितीय. तरी ते गोष्ट कार्याची नाहीं. तरी जो ऐवज बाकी निघेल तो करार करून लिहून पाठवणे. त्याप्रमाणे येथून कापडकरी सावकार याच्या वराता होतील. मोतबर खंडण्या म(ल्हारबानीं) × × × केल्या आहेत. त्याचे बाकीचे व(सूल) + + + फौज गेलियावर होईल. परंतु आजपर्यंत वसुलावर अमलदार आहेत. त्याचे हिसेब तर तुम्हाजवळ यावे. ते तावार आणवणे. प्राा (?) अंतरवेदचा वसूल बाकीचा करार करून येथे भरणा करावा असे सारे मामलेदाराचा करून लेहून पाठवणे, त्याप्रो घेऊन. राा छ २९ सवाल २हे आशिर्वाद. (पत्र नानासाहेबाचें रघुनाथरावास उत्तरस्वारींत).