Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.82: [8-10-1757] Raghunathrao to the Peshwa suggesting that Dattaji should be ready to return to the North as soon as news comes of Abdali's return.

Selections from the Peshwa Daftar 2.82

Language
Marathi

2.82

श्री.

पो २२ सफर

सेवेसी विज्ञापना. राजश्री दत्ताजी शिंदे यांस गुजराथ प्रांतीं पाठवावयाचा विचार स्वामीनी केला. उत्तमच आहे. परंतु अबदाली तूर्त येतो न येतो हें कांहीं तथ्य नाहीं. कदाचित आलाच तरी पेंच फारच पडेल; त्यास येविशी दत्तबास सांगावें कीं, अबदालीची बातमी राखून आटक उतरतांच त्याणी जेथें असतील तेथोन येऊन आम्हास सामील व्हावें. अबदालीचें पारपत्यास फौज मातबर असावी, याजकरितां दत्तबा जरूर येत तें करावें. जरी अबदाली ईकडे न आला तरी दत्तात्रांनीं स्वस्थतेनें गुजरातेचें कार्य करावें. अमदाबादेनें बदनक्ष केला आहे, याजकरितां मोमनिखानाचें पारपत्य करणें उचित आहे. खाना छ २३ मोहरम बहुत काय लिहिणें हें विनंति.

[१. येथून अक्षरे भाऊसाहेबांचें. २. येथून अक्षर नानासाहेबांचें.]