Selections from the Peshwa Daftar 2.83: [17-11-1757?] Raghunathrao's presence in the North has emboldened the Sikhs to rise against Abdali.
Selections from the Peshwa Daftar 2.83
- Language
- Marathi
2.83
श्री.
छ २९ रविलाकर
पु॥ श्रीमंत राजश्री पंतप्रधान स्वामीचे सेवेसी विज्ञाप्ति येसीजे. दिलाराम दि॥ आदिनाबेग यानी पत्र स्वामीस व आम्हास लिहिली आहेत, तेच बजिनस सो॥ पाठविली आहेत, ते प्रविष्ट होऊन श्रुत होईल. पत्रातील वर्तमान पंजाबाकडील वृत्त लिहिले आहे. शाह अब्दालीने आपले तर्फेने लाहोरात व द्वाबीयांत व सरहंद वगैरे जागा जागा नायेब ठेऊन गेला होता. त्यास सिखानी जमाव करून आमचे सल्लाह बमॉजीब अब्दालीच्या अमलांत खलेल केला, आणि जागाजागांची ठाणीं उठऊन दिल्ही. साहादतखां आफरीदी यास द्वात्रियात खराब केलें. द्वाव सारा लुटिला. जमीदारास बहकाऊन कढा (?) घो. नानकपंथी याचे रु. घेतले. शेवटी आफरीदी पाहाडांत उठून गेला. लाहोरांत खोजे उबेदखा सुभेदार याचे सांगाते फौज वीस हजार स्वार प्यादा घेऊन सिखांसी युद्धास आले जुंज जाले. सेवटीं खान मजकुराची सिकस्त जाली. बहुतेक सरदार मारले पडले. बाहीर बुनगे सर्व लुटून घेतले. तोफखाना शाह सोडून गेला होता तो सर्व लुटिला. काबलेस शाह आबदाली आहे. तेथून हरकारे शहाचे लष्करांतून खबर घेऊन आले. छ ११ रौवल पावेतो खबर तहकीक आली कीं शाह काबलेस आहे. कंधार आणि कसले लुटिला. शाहचा यांत इरानाकडून खलेल उठला आहे. त्यास आबदालीनें फौज आपली कधारेकडे पाठविली होती. ते आतां खबर येथें यावयाची बहुत आहे. चपर आपले फौज आणावयास कधारेस पाठविले होते. तोफखाना व फीलखाना आबदालीचा सर्व पिसेरैं व जलालाबादमधे आहेत तोफखानियास ताकीद जाली आहे. हिंदुस्थानास रवाना करणार. तेच पत्रे बजिन्नस सो॥ पाठविली आहेत. वृत्त श्रुत होईल. उत्तरे सत्वर पाठविणार स्वामी समर्थ आहेत. कृपा केली पाहिजे हे विज्ञाप्ति.
[१. हत्तीखाना. २. पेशावर.]
[१ अंत]