Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.84: [24-11-1757] Sakharam Bapu's handwriting of this letter may indicate that Raghunathrao writes it to the Peshwa from the Doab, summarising the achievements of the Lahore expedition, 1756-58.

Selections from the Peshwa Daftar 2.84

Language
Marathi

2.84

श्री.

पौ छ ११ रबिलोवल

सेवेसी विज्ञापना. आम्ही अंतरवेद प्रांते आलो. मुलकाची जप्ती केली. याचे वृत्त तपसिले सेवेसी लिहिलेच आहे. विदीत जाले असेल. नजीब काढून दिल्हा. आबदालीचा बंदोबस्त दूर करून श्रीमंताच्या हातचा जाला. पुढील तह निमेचा करार ठरला. त्यात बावीस सुभ्याचा तपसील. सा सुभे दक्षण, माळवा, गुजरात, अगरे, आजमेरे हे सुभे तर आपणाकडे आलेच आहेत. लाहोर प्रांती अटकपावेतो सा सुभे अबदालीकडे आहेत. बाकी पाच सा राहिले. त्यात प्रयागापैकी कडाकुरा वगैरे अंतरवेद आपणाकडे पहिली आहेच. आयोध्या, बंगाला, दिली, पटणे हे राहिले. त्यांत दिली खाले एक करोडीचा मुलुक सरदेपावेतो प्रस्तुत कांहीं कम असीनंवद पावेतो तर वसुलीच आहे. यापैकी निमे महाल चाळीस पंचेताळीस पावेतो वाटून दो चौ दिवसात घेतील. बंगाल्याचे दरसाल पातशहास चौपन लक्ष येतात. आपले सलावतीनें नवे जे साधतील ते साधावे. निमेनिम घ्यावे. या प्रमाणेच आयोध्या दोन जागे मात्र जो आकारेल तो निमेनिम घ्यावा. वरकड जाट तरी आगरे सुभ्यात आला याप्रों जाले. मेहनत केली तर लाहोर वगैरे हेहि सुभे सुटावयाजोगे आहेत. स्वामीचे पुण्य थोर आहे. काले करून सर्व होऊन येईल. सदैव कृपा कटाक्षे करून पत्री सांभाळीत असावें. आमचे पदरी लेकूरपण आहे. वारंवार शिक्षायुक्त लेखन केलिया उत्तम आहे. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.