Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.86: [1758?] A mutilated letter describing the confusion created by the armies of the Jat.

Selections from the Peshwa Daftar 2.86

Language
Marathi

2.86

(पहिलें पान मिळालें नाहीं).

विज्ञापना.

x x x संग आहे. त्याचा जाबसाल त्याणी लिहिलें कीं मी सिबंदीचे स्वाधीन आहे. जो येईल त्याने माझे रुपयाची वाट करावी. याप्रमाणें त्याणी लिहिले. त्यावरून जमातदार भीड सुधा येथें आहे. त्यास याजला एक आज्ञापत्र सादर करावें कीं रा।। आपाजीपंताजवळ राहून ते सांगतील त्याप्रमाणें चाकरी करीत जाणें. तरी यांसी जरूर चिठी लिहावी. आम्ही यांस आपल्या जवळ ठेऊन घेतले आहे. सरकारचे कोन्ही ग्रहस्त येतील अथवा महूस पाठवावयाचें होईल तेव्हां आम्हांस लिहावें. आम्ही हे व आणखी जे आज्ञा होईल ते पाठवूं. परंतु तूर्त यासीं येथील चाकरीचे लिहिले. जाटाची फौज दरोबस्त इदृखी व माहाद्याचे कच्छारावर पडली आहे. लाहारेस सडी दौड जाली आहे. गुरे ढोरे वळून नेली. तमाम प्रांत उज्याड आहे. इकडील चिंता स्वामींनी न करावी. खावंदाचा प्रतापहास्त मस्तकी आहे. तरी ईश्वर उत्तम करील. आमची एकनिष्ठता असली तरी सर्व गोष्टी उत्तम होतील. सदैव कृपापत्री सेवकास सनाथ करावें. बहुत काय लिहिणें. लोभाची वृद्धी करावी हे विज्ञापना.

[१ अंताजी माणकेश्वराचा मावसभाऊ आडनांव अत्रे (?)]