Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.87: [February 1758] Orders are sent to Antaji Mankeshwar and Samsher Bahadar to proceed towards Ajmer to the succour of Govind Krishna, whom Bijesing was harrassing.

Selections from the Peshwa Daftar 2.87

Language
Marathi

2.87

श्री.

यादी निसबत गोविंद कृष्ण रा।। अजमेर :

२. साहित्यपत्रें राजश्री अंताजी मानकेश्वर व समशेर बहादर यास कीं मारवाड प्रांतीं विजेसिंगानें दंगा करून ठाणे उठविली आहेत. आजमेरी × × × म्ही पत्र दर्शनी ते प्रांती जाऊन गोविंद कृष्ण याची मदत करून विजेसिंगाचे पारपत्य करून ठाणी कायम राखवणे व गोविंद कृष्ण याचा उपराळा अजमेर किल्याचा करणे.

१. किल्याचे खर्चाची काही तूर्त वरात ते प्रांती गोविंद कृष्ण यांजकडे बेजमी करवावी.

१. गोविंद कृष्ण याच्या पत्राचें उत्तर आज्ञा करणे ते करावी.