Pramāṇa · Search · About · API

Selections from the Peshwa Daftar 2.88: [15-4-1758] The writer of the letter Rajaram Govind requests Raghunathrao not to leave Northern India. His presence was necessary to keep down the newly conquered provinces and rebellious rulers.

Selections from the Peshwa Daftar 2.88

Language
Marathi

2.88

श्री.

[... ] राजाराम गोविंद विज्ञाति ऐसीजे. इकडील वर्तमान तरी पूर्वी सविस्तर सेवेसी [ ... ] पाठविली त्याजवरून वृत श्रुत होईल. हाली वर्तमान विनंतीपत्रे सेव[... ] येक दोन ग्रहस्त आहमदखानाकडे वगैरे रोहिलेयाकडे सरकारचे खलिते घेऊन [ ... ] फिसाद पठाणाच्या चितात घातला की श्रीमंत आले. त्यानी कितेक प्रकारे [ ... ] त्या गोष्टीस वजीरहि माहित आहेत व दक्षिणे जातात म्हणून सांगितले. [ ... ] काही आठ महिने बसून काम नसुदेत सेवकासहि कलले आहे. वजिराही व सेव[ ... ]तात त्याच्या मते की याचे केले आणिले आहे. त्यात जे ग्रहस्त फिसाद घा[लि]लगना केल्या आहेत त्या सेवेसी न होये ते करावे. ऐसा कितीक प्रकारे व[ ... ] सारांश की फौज घेऊन आलो. आल्यावरी तपसीलवार निवेदन केल्या जातील. [ ... ]करून आणखीकडे न जावे. छ स्वामीही वजिरास भेटल्याखो तेथून कूच [ ... ]रून वजिरास व सेवकास रूकसंत ६ साबानी आहमदखान वजिराचे येथे ये[ ... ]शाहासीहि जुजावयाची आसिली केले व जबानी सागितले कीं श्रीमंताची मर्जी प्रकार तर आम्ही तयार आहो. मग वरकडाचा काय मजकूर ? ऐसे कितीक [...]

[× या मोहिमेचा उलगडा झाला पाहिजे. विजेसिंगाची हयात सन १७५३-९३.]

[१ रजा दिली]

भाषण स्नेहाची केली. तो विस्तार हजूर येऊन विनंती करू व हेहि बोलिले की आम्ही सर्वांसी तोडून स्वामीचे जाहालो व स्वारी देशास जाणार म्हणून येथे कोणी सागतात तर गोष्ट न करावी. ये प्रांतीचा बंदोबस्त झाल्यावर जैसी मर्जी असेल तैसे करणार स्वामी समर्थ. याप्रमाणे सागितले ते सेवेसी विनंती लि॥ असे श्रुत होये. आम्ही उतर दिधले कीं, तुम्हास येथे लोक सागतात की श्रीमंत दक्षिणेस जातात व श्रीमंतास कितीक अर्ज करितात की पठाण रोहिले याच्या फौजा येत नाही, उगेच लाऊन ठेविले आहे. त्यास त्या गोष्टीवर मदार काय आहे. अतःपर सत्वर फौजा पाठऊन स्वामीचे मनास तुमचे सत्यवादीपण दृढतर होये ते करावे याप्रमाणे उतर दिल्हे. त्यानीहि मान्य केले. विस्तारे हजूर येऊन श्रुत करू. वजीरानी पत्रे सेवेसी पाठविली आहेत. उतरी सनाथ करणार स्वामी समर्थ आहेत. इटावाियासी नावाची परवानगो गोविंदपंताच्या पुत्रास पाठविली पो. इटावाियाच्या नावा पाच सात आहेत. तेवढियानें फौज उतरावयासी दिरंग लागेल. फौज उतरून नावा फिरोन आपले घाटास घेऊन जाणे म्हणून आज्ञापत्र सादर केले पाहिजे. दक्षिणेस जावयाचे हरगीज तूर्त न करावे. स्वामी दक्षिणेस गेले तरी मागे अबदाआली आल्यावर जाठ, माधोसिंग हे मालव्या प्राती धामधूम करतीलसे दिसते. स्वामी या प्राती आल्यावर आबदाआलीचाहि सढूक अहमदखानाच्या मा होईल. यास्तव याच्या फौजा व वजीर येऊन पावेतो पावेतो हरगीज मागे फिरावयाचे न करावे. आठा दाहा दिवसी येऊन पावतो. मग जो विचार करणे तो करावा. याउपरी मर्जीस येईल ते खरे. सेवेसी श्रुत होये हे विज्ञापना.